प्रवीण खिरटकर वरोराएम.एड.ला प्रवेश घेताना बी.एड. परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य होते. परंतु यावर्षीपासून एम.एड.ला प्रवेश घेताना डी.एड. व विद्यापीठाची पदवी असल्यास प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे डी.एड. व पदवी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना एम.एड. प्रवेशाचा मार्ग बी.एड.विनाही सुकर झाला असल्याचे मानले जात आहे.बी.एड. अभ्यासक्रम यावर्षीपासून पदवीनंतर दोन वर्षाचा झाला आहे. नुकतीच बी.एड. व एम.एड.करिता केंद्रीय सामाईक प्रवेश परीक्षेसाठी परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. मान्यता प्राप्त अकृषक विद्यापीठांच्या एनसीटीई मान्यताप्राप्त अध्यापक महाविद्यालयातून बी.एड., बी.ए., बि.एस.सी बी.एड., प्राथमिक शिक्षण पदवी प्राप्त व खुल्या संवर्गातील महाराष्ट्राबाहेरील विद्यापीठाच्या सर्व संवर्गातील ज्या उमेदवारांना ५० टक्के गुण असतील अथवा समकक्ष श्रेणी प्राप्त केली असेल व ४९.५० ते ४९.९९ टक्केपर्यंत गुणधारकांचे गुण ५० टक्के गणण्यात येणार आहे. मागासवर्गीय संवर्गातील ४५ टक्के गुण असणारे विद्यार्थी एम.एड. प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेत बसण्याकरिता पात्र राहतील. सोबतच ज्या उमेदवारांनी मार्च-एप्रिल २०१५ ची बी.एड. परीक्षा दिली असेल, असे उमेदवारही पात्र ठरणार आहे. यासोबतच ज्या उमेदवारांनी डी.एड.ला ५० टक्के व पदवीला ५० टक्के गुण प्राप्त केले असेल, असेही उमेदवार यावर्षीपासून प्रथमच एम.एड.च्या सीईटी परीक्षेस पात्र राहणार आहे. डी.एड. व पदवी प्राप्त करणाऱ्यांना आता एम.एड. करण्याकरिता बी.एड.पदवीची आवश्यकता भासणार नाही. एक वर्षाचा असणारा एम.एड. अभ्यासक्रम यावर्षीपासून दोन वर्षाचा करण्यात आला आहे.बीपीईलाबी.एड.मध्ये प्रवेशज्या विद्यार्थ्यांनी बॅचलर आॅफ फिजीकल एज्युकेशनमधून तीन वर्षीय अभ्यासक्रम पूर्ण करून मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी घेतली आहे, अशा उमेदवारांना बी.एड.ची सीईटी परीक्षा दिल्यानंतर बी.एड. अभ्यासक्रमात प्रवेश मिळणार आहे.
डी.एड.सोबत पदवी असल्यास थेट एम.एड.ला प्रवेश
By admin | Published: July 09, 2015 12:52 AM