शहरं
Join us  
Trending Stories
1
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
2
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
3
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
4
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
5
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
8
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
9
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
10
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
11
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
12
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
13
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
14
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
16
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
17
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
18
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
19
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल

२१ वर्षांनंतरही जुळे चंद्रपूर नागरिकांच्या प्रतीक्षेतच

By admin | Published: November 19, 2014 10:35 PM

प्रचंड गाजावाजा करून तब्बल २१ वर्षांपूर्वी नियोजित केलेल्या जुळ्या चंद्रपूरला अजूनही नागरिकांच्या वसाहतीचीच प्रतीक्षा आहे. केवळ बोटावर मोजण्याएवढी तुरळक आणि विरळ वस्ती सोडली तर,

१९९३ चा आहे आराखडा : अजूनही केवळ तुरळक वसाहतगोपालकृष्ण मांडवकर - चंद्रपूरप्रचंड गाजावाजा करून तब्बल २१ वर्षांपूर्वी नियोजित केलेल्या जुळ्या चंद्रपूरला अजूनही नागरिकांच्या वसाहतीचीच प्रतीक्षा आहे. केवळ बोटावर मोजण्याएवढी तुरळक आणि विरळ वस्ती सोडली तर, अजूनही बराचसा भूभाग ओसाडच आहे. यामुळे जुन्या चंद्रपूरवरचा भार अजूनही कायमच आहे.२१ आॅगस्ट १९९३ मध्ये नव्या चंद्रपूरची संकल्पना अस्तीत्वात आली होती. त्यानंतर २ सप्टेंबर १९९३ रोजी जुळ्या चंद्रपूरचा नियोजन आराखडा (डी.पी. प्लॅन) तयार करून तो सादर करण्यात आला होता. १ हजार ६०० हेक्टर म्हणजे ४ हजार एकर परिसरात हे नवे शहर वसविले जाणार आहे. या नियोजन आराखड्यात रूंद रस्ते, उद्याने, शालेय परिसर, रूग्णालये, बाजारपेठा, ट्रक टर्मिनल हब, जल शुद्धीकरण प्रकल्प, डे्रनेज लाईन, जल-मल निस्सारण योजना आदींसह अनेक बाबींचा अंतर्भाव करण्यात आला आहे. हा आराखडा केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरवून त्या दृष्टीने आखणीही करण्यात आली आहे. नव्या चंद्रपूरच्या विकासाच्या दृष्टीने चार सेक्टर पाडण्यात आले असून सर्व सेक्टरमध्ये जीवनावश्यक गरजांची पूर्तता करणाऱ्या बाजारपेठेसह दळणवळणासाठी रुंद रस्त्यांचाही अंतर्भाव आहे. गेल्या चार वर्षात जुळ्या चंद्रपुरात रस्ते आणि नाल्यांचे जाळे निर्माण केले गेले. विद्युत पुरवठाही पोहचविण्यात आला. मात्र ज्यांच्यासाठी हे सर्व होत आहे, त्या नागरिकांनीच मात्र या नव्या शहराकडे पाठ फिरविल्याने निराशाजनक चित्र निर्माण झाले आहे.नव्या चंद्रपुरात सध्या ५०० क्वॉर्टर तयार आहेत. या सोबतच २१४ फ्लॅटची योजनाही तयार आहे. नव्या कृती आराखड्यानुसार या क्वॉर्टरपर्यंत रस्ते, नाल्या, वीजही पोहचली आहे. अलिकडेच पत्रकारांसाठी १०० घरकुलांचा प्रस्तावही निघाला आहे. या परिसरात रस्ते, वीज, नाल्या तयार झाल्या आहेत. या बांधकामात महत्वाची भूमिका बजावणाऱ्यांमध्ये जयंत मामीडवार यांच्या गजानन कन्स्ट्रक्शन कंपनीचे नाव पुढे आहे. या परिसरात उभारल्या जाणाऱ्या बगीचासाठी खनिज विकास निधीतून तरतुद करण्यात आली आहे. दररोज २ लाख व्यक्तींना पाणी पुरवठा करू शकणारा जलशुद्धीकरण प्रकल्पही पूर्णत्वाकडे आला आहे.हा परिसर चंद्रपूरकरांना खुणावत असला तरी अद्यापही आवश्यक सोई सुविधा न पोहचल्याने चंद्रपूरकरांचे बिऱ्हाड नव्या शहराकडे वळताना दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे.