लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : सिंचनासाठी वाळवंट असलेल्या चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत होते. परिणामी शेतकºयांची पिके एका पाण्यामुळे जात होती. परिणामी शेतकरी सिंचनाची प्रतीक्षा करीत होते. पाणी समस्या सोडविण्यासाठी अनेक वर्षांपूर्वी मोखाबर्डी जलसिंचन योजनेचे भूमिपूजन केले होते. अनेक कारणांमुळे ही योजना रखडली होती. मात्र आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्या प्रयत्नामुळे महिनाभरात चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळणार असल्याने शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येणार आहेत.मोखाबर्डी जलसिंचन योजना अनेक कारणांमुळे रखडली होती. परिणामी शेतकरी योजनेसाठी चातकाप्रमाणे वाट बघत होते. शेतकऱ्यांच्या पाण्याची अडचण दूर व्हावी, म्हणून आमदार भांगडिया यांनी शासन स्तरावर पत्र व्यवहार केला. यात त्यांना यश आले असून ही योजना पूर्णत्वास आली आहे. बुधवारी आमदार भांगडिया यांनी जलसिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता नाईक, विनोद अग्रवाल यांनी सिंचन योजनेची पाहणी करीत आमदार भांगडिया यांनी पंप हाऊसची कळ दाबून योजनेची टेस्टिंग केलीयावेळी भाजप ज्येष्ठ नेते वसंत वारजूकर, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. श्याम हटवादे, तालुकाध्यक्ष डॉ दिलीप शिवरकर, बकाराम मालोदे, बंडू जावडेकर, तालुका महामंत्री प्रवीण गनोरकर, सरपंच कलीम शेख, पं. स. सदस्य प्रदीप कामडी उपस्थित होते.निवडणुकीत चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध करुण देण्याची हमी घेतली होती. ती आज प्रत्यक्ष अमंलात येत असल्याने शेतकऱ्यांसाठी ही एक जलक्रांती ठरणार आहे. तसेच येत्या काही दिवसात मासळ, मदनपूर क्षेत्रात सूक्ष्म ठिंबक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देणार.-किर्तीकुमार भांगडियाआमदार, चिमूर विधानसभा क्षेत्र.
अखेर मोखाबर्डीचे पाणी चिमूर तालुक्याला मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 10:42 PM
सिंचनासाठी वाळवंट असलेल्या चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत होते. परिणामी शेतकऱ्यांची पिके एका पाण्यामुळे जात होती. परिणामी शेतकरी सिंचनाची प्रतीक्षा करीत होते.
ठळक मुद्देकीर्तीकुमार भांगडिया : जलक्रांतीला सुरुवात