लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती: गेल्या पाच दिवसांपासून एका पट्टेदार वाघाने या भागात बस्तान मांडून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली होती. वाघाला जंगलात हुसकावून लावण्यासाठी वनविभागाने रात्रंदिवस प्रयत्न केले. शेवटी या वाघाने जंगलाच्या दिशेने पलायन केले. बरांज तांडा या भागाकडून कर्नाटका एम्टा कोल माईन्सच्या जंगल भागाकडे निघून गेला असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती महेशकर यांनी सांगितले. आता छत्रपती ले-आऊटमधील स्नेहल व गौतम नगर भागातील नागरिकांनी वाघाच्या दहशतीत बाळगून नये, घाबरण्याचे कोणतेही कारण नाही, असे आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी केले.
अखेर ‘त्या’ वाघाने जंगलाच्या दिशेने केले पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 10:38 PM