शहरं
Join us  
Trending Stories
1
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
2
वैवाहीक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
3
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
4
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
5
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
6
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
8
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार
9
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
10
"त्याचा लहान भाऊ म्हणून...", छोटा पुढारीने सूरज चव्हाणबाबतीत दिला मोठा शब्द
11
महाराष्ट्रातील क्रीडारत्नांचा सन्मान! अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, प्रदीप गंधेंना 'जीवन गौरव'
12
इस्रायलचे गाझावर भीषण हवाई हल्ले; हमास प्रमुख रावी मुश्ताहा याच्यासह तीन टॉप कमांडर ठार
13
त्वेशा जैनने पटकावली दोन रौप्यपदकं! राज्य बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत केली चमकदार कामगिरी
14
"राहुल गांधींनी काँग्रेसमध्येही ड्रग्सचा धंदा सुरू केलाय का?"; अनुराग ठाकूर यांचा खोचक सवाल
15
Rohit Sharma लिलावात आल्यास RCB ने संधी सोडू नये; दिग्गजाचं मोठं विधान, हिटमॅनलाही सल्ला
16
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!
17
“अक्षय शिंदेच्या बेड्या का काढल्या, फॉरेन्सिक रिपोर्टचे काय?”; हायकोर्टाचे प्रश्नांवर प्रश्न
18
Womens T20 World Cup 2024 : ती एकटी पडली; बांगलादेश संघाची विजयी सलामी!
19
“...तर ती देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीतील मोठी चूक असेल”; मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा
20
Womens T20 World Cup: 'ब्लॅक बेल्ट' आहे हिजाब घालून मैदानात उतरलेली ही महिला क्रिकेटर

आश्वासनानंतर उपोषण घेतले मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2018 10:43 PM

तालुक्यातील गडचांदूर येथे गडचांदूरचा विकास हेच आमचे ध्येय या संघटनेचे अध्यक्ष महालिंग कंठाळे यांनी गांधी जयंतीपासून विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी अन्नत्याग सत्याग्रह सुरू केले होते. प्रशासनाच्या समाधानकारक उत्तरामुळे शुक्रवारी महालिंग कंठाळे यांनी आपले उपोषण तात्पुरते मागे घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : तालुक्यातील गडचांदूर येथे गडचांदूरचा विकास हेच आमचे ध्येय या संघटनेचे अध्यक्ष महालिंग कंठाळे यांनी गांधी जयंतीपासून विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी अन्नत्याग सत्याग्रह सुरू केले होते. प्रशासनाच्या समाधानकारक उत्तरामुळे शुक्रवारी महालिंग कंठाळे यांनी आपले उपोषण तात्पुरते मागे घेतले.गांधी चौकात सुरू असलेल्या या अन्नत्याग सत्याग्रहाच्या माध्यमातून गडचांदूर तालुक्याची मागणी पूर्ण करणे, गडचांदूर बसस्थानकाची निर्मिती करणे, शुद्ध पेयजल योजना राबविणे, गडचांदूर ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देणे, माणिकगड सिमेंट कंपनीने गडचांदूरला दत्तक घेणे, स्थानिकांना रोजगार देणे, कंपनीने काढलेल्या कामगारांना कामावर घेणे, ऐतिहासिक बुद्धभूमी व लंगडा मारुती मंदिर नाल्यावर पूल बांधणे, क्रीडा संकूल व व्यायामशाळेची निर्मिती करणे, ओपन स्पेस व चौकांचे सादरीकरण करणे, अतिक्रमणधारकांना नियमित पट्टे देणे, सांस्कृतिक भवन व सार्वजनिक वाचनालयाची निर्मिती करणे, गडचांदूर येथे उपविभागीय पोलीस कार्यालय देणे, पोलीस कर्मचाऱ्यांना सदनिका देणे, बंगाली कॅम्पचे पूनर्वसन करणे, अपंग व्यक्तींना पाच टक्के निधी व घरकुल योजनेचा लाभ देणे, रेल्वेस्थानक, शीत शवपेटी, घनकचरा प्रकल्प, अग्निशामक दल अशा विविध २२ मागण्या महालिंग कंठाळे महाराज यांनी प्रशासनासमोर ठेवल्या होत्या. तहसीलदार हरीश गाडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय जाधव, ठाणेदार सुनीलसिंग पवार, नगर परिषदेचे गटनेते पापय्या पोन्नमवार, विठ्ठल थिपे, बंडू धोटे, हंसराज चौधरी, रऊफ खान, वजीर खान पठाण, डॉ. प्रवीण लोनगाडगे, संघटनेचे मुख्य संघटक बंडू वैरागडे, संघर्ष समितीचे मुख्य संघटक उद्धव पुरी, विक्रम येरणे इत्यादींच्या उपस्थितीत महालिंग कंठाळे यांना शरबत पाजून उपोषण मागे घेण्यात आले. अन्नत्याग आंदोलन स्थगित करण्यात आले असून २६ जानेवारीपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन करणार, असे महालिंग कंठाळे यांनी सांगितले.