गणपती बाप्पा सर्वांचा लाडका देव! त्यातल्या त्यात लहान मुलांचा अत्यंत लाडका व जिवाभावाचा मित्र! बाप्पाच्या घरातील आगमनानंतर लहान मुले त्याच्यात फार रमून जातात. बाप्पांना फुलं वाहा, गंध लावा, आरती करा, नैवेद्य ठेवा असे विविध काम गणेशोत्सवप्रसंगी लहान मुले आनंद व उत्साहाने करीत असतात. यातून बाप्पाचा त्यांना लळा लागतो. म्हणूनच बाप्पाचे परत जाणे, त्यांचे विसर्जन करणे बच्चेकंपनीला आवडत नाही. पाच-दहा दिवसातच जीवलग मित्र वाटणाऱ्या बाप्पांना निरोप देताना मग रडू कोसळले. मुलांचेच नाही तर अगदी मोठ्यांनाही बाप्पांचा लळा लागतो. त्यांना निरोप देताना मोठ्यांचीही मने हेलावतात. डोळे पाणावतात. दीड ते दहा दिवसांपर्यंत मुक्कामी घरी आलेला पाहुणा आहेस तसा जीव लावणारा.
बाप्पाच्या विसर्जनानंतर तो हुंदके देत रडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 4:30 AM