लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जून महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना जुलैअखेर पावसाने दिलासा दिला. मात्र जुलै व आॅगस्ट महिन्यात संतरधार पाऊस कोसळला. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण वाढली असून कपाशी व सोयाबिन पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर तण निर्माण झाले आहे. परिणामी निंदणाचा खर्च वाढत आहे.सध्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना महिला मजुरांची निंदन कामासाठी मनधरणी करावी लागत आहे. यावर्षी महिला मजुरांची मजुरी १५० ते २०० रुपयांच्या घरात असून गावापासून शेतापर्यंत मजुरांच्या वातहुकीचा खर्चही शेतकऱ्यांनाच करावा लागत आहे. महिला मजुरांची टंचाई असल्याने १० ते १५ महिलांचा जत्था तयार करुन काही महिला ठेका पद्धतीनेही निंदन करून देत आहेत. मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पैसा मोजावा लागत आहे.चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा, कोरपना, वरोरा, जिवती, भद्रावती आदी तालुक्यात सोयाबीन, कपाशी, तूर तसेच सिंदेवाही, सावली, ब्रह्मपुरी, मूल या तालुक्यांमध्ये भात पिके घेतले जातात. यावर्षी पावसामुळे सुरुवातीला लागवड उशिरा करण्यात आली. त्यातच पावसाने जूनमहिन्यात दगा दिला. त्यानंतर जुलै महिन्याच्या शेवटी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला, मात्र जुलैच्या मध्यापासून सतत पाऊस सुरु झाल्याने सोयाबिन व कपाशी या दोन्ही पिकांत मोठ्या प्रमाणात तण वाढले आहे.तणाची काढणी करण्यासाठी खर्चही वाढत आहे. त्यामुळे महिला मजुरांना मोठी मागणी आहे. सकाळी ९.३० वाजतापासून महिला मजूर शेती कामावर जात आहे. सायंकाळी ५.३० पर्यंत काम करण्यात येत असून २०० रुपये रोज द्यावा लागत आहे. एकाच वेळी अनेक शेतकऱ्यांचे निंदनाचे फेर आल्याने महिला मजुरांचे भाव वधारले आहे.अतिरिक्त खर्चपूर्वी गावातून शेत मजूर पायी जात होते. मात्र गेल्या काही वर्षांत मजुरांच्या वाहतुकीसाठी आॅटो रिक्षा, मालवाहू वाहन आदींची सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करुन द्यावी लागत आहे. यासाठी किमान ३०० रुपये खर्च प्रती दिवस शेतकऱ्यांवर बसत आहे.
सततच्या पावसानंतर आता शेतीच्या निंदण खर्चात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 12:31 AM
जून महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना जुलैअखेर पावसाने दिलासा दिला. मात्र जुलै व आॅगस्ट महिन्यात संतरधार पाऊस कोसळला. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण वाढली असून कपाशी व सोयाबिन पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर तण निर्माण झाले आहे.
ठळक मुद्देआर्थिक कोंडी : मजुरांच्या वाहतुकीचा खर्चही शेतकऱ्यांवर