लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वाहतूक नियमांचे सतत उल्लंघन करणे, कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालून अनेकवेळा कामात अडथडा निर्माण करणे या प्रकारामुळे पोलीस कर्मचारी अक्षरश: त्रस्त झाले आहेत. यावर उपाय म्हणून पोलीस प्रशासनाने ई-चालनाद्वारे दंड आकारणे सुरु केले आहे. असे असले तरी वाहनचालक आणि वाहतूक पोलिसांमधील वाद काही कमी झाले नसल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.दंड आकारणीच्या रोख व्यवहारात पोलीस कर्मचारी अपहार करतात, असा आरोप नागरिकांचा होता. यावर आळा घालण्यासाठी ई- चालान दंड आकारण्यात येत आहे. मोबाईल किंवा व्हॉट्सअॅपवर दुचाकीस्वाराचा फोटो काढून तो आॅनलाईन पाठविला जात असून त्याद्वारे दंड वसूल केला जात आहे.वाहतूक नियमांचे पालन केल्यास पोलीस हटकणार नाही. मात्र नियम मोडणार आणि पोलिसांना पाहून न पाहिल्यागत करीत सुसाट वाहनावरून पळून जाणे हे नियमांविरूध्द आहे. जीवन मौल्यवान आहे. धावत्या वाहनावर फोन वापरू नका, वाहतूक नियमांचे पालन करा, रूग्णवाहीकेला रस्ता मोकळा करून द्या, असे समुदपदेशन अनेकवेळा केले जाते. मात्र वाहनधारक याकडे दुर्लक्ष करून वाहन चालवितात. त्यामुळे अनेकवेळा वाहतूक पोलीस आणि वाहनधारकांमध्ये भांडणे सुद्धा होत आहेत.वाहन अडवून त्यांची चावी काढून घेणे, हा प्रकार वाहतूक कर्मचाऱ्यांनी टाळायला हवा आॅनलाईन दंड ई-चालनचा वापर करा, असे त्रस्त वाहनचालकाचे म्हणणे होते. त्यानुसार ई-चालान सुरु करण्यात आले आहे. मात्र पोलीस आणि वाहन धारकांमधील धुसफूस कमी झालेली नाही. आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.नागरिकांनी आपली मानसिकता बदलावी. कुणीही कायदा हातात घेऊ नये, वाहतुकीचे नियम पाळावे. आपल्यामुळे दुसऱ्या वाहनधारकांना त्रास होऊ नये याची काळजी वाहनधारकांनी घ्यावी. वाहतूक नियमांचे उल्लंघन करतील त्यांना दंड भरावा लागेल.-किसन शेळकेवाहतूक पोलीस निरीक्षक, चंद्रपूर
ई-चालानानंतरही वाहनधारक पोलिसांमध्ये वाद कायमच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 12:21 AM
वाहतूक नियमांचे सतत उल्लंघन करणे, कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालून अनेकवेळा कामात अडथडा निर्माण करणे या प्रकारामुळे पोलीस कर्मचारी अक्षरश: त्रस्त झाले आहेत. यावर उपाय म्हणून पोलीस प्रशासनाने ई-चालनाद्वारे दंड आकारणे सुरु केले आहे. असे असले तरी वाहनचालक आणि वाहतूक पोलिसांमधील वाद काही कमी झाले नसल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.
ठळक मुद्देहोणार कारवाई : वाहतूक नियम मोडणारच ही वृत्ती घातकच