शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
3
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
4
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
5
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
6
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
7
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
9
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
10
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
11
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
12
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
13
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
15
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
16
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
17
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
19
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
20
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी

पाच तपानंतर बदलतेय राष्ट्रसंतांची ‘तपोभूमी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 11:32 PM

‘पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, भक्त बनेगी सेना...’ अशा क्रांतिकारी भजनाने जनमाणसात देशप्रेम जागृत करीत मानवतेचा संदेश साºया देशात पोहचविणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी म्हणून चिमूर तालुक्याला ओळखले जाते.

ठळक मुद्दे३४ कोटींची तरतूद : पर्यटन स्थळाच्या दर्जातून विकास

राजकुमार चुनारकर ।आॅनलाईन लोकमतचिमूर : ‘पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, भक्त बनेगी सेना...’ अशा क्रांतिकारी भजनाने जनमाणसात देशप्रेम जागृत करीत मानवतेचा संदेश साºया देशात पोहचविणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी म्हणून चिमूर तालुक्याला ओळखले जाते. चिमूरपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या गोंदेडा येथे राष्ट्रसंतांनी ध्यान साधना केली. त्यामुळे गोंदेडा या भूमीला संपूर्ण देशात ‘तपोभूमी’ म्हणून ओळखले जाते. तपोभूमीला विकासासाठी ‘पाच तपाची’ प्रतीक्षा करावी लागली. मागील तीन वर्षांपासून सुरू असलेली विकासकामे काही प्रमाणात पूर्ण होत असल्याने तपोभूमीचे रुप पालटत आहे.अमरावती जिल्ह्यातील ‘यावली’ येथे राष्ट्रसंतांचा जन्म झाला असला तरी त्यांची कर्मभूमी चिमूर तालुका आहे. राष्ट्रसंतांच्या प्रेरणेमुळेच चिमुरात १६ आॅगस्ट १९४२ ला इंग्रजाविरूद्ध क्रांती झाली. चिमूर तालुक्यातील गोंदेडा गुंफा येथे राष्ट्रसंतांनी ध्यान साधना केली. यामुळे या भूमीला तपोभूमी म्हणून पुर्ण राज्यात नावलौकिक प्राप्त झाले आहे. या भूमीत प्रत्येक वर्षी पाच दिवस यात्रा भरते. या निमित्ताने हजारो गुरुदेवभक्त या ठिकाणी पावन भूमीच्या दर्शनासाठी येऊन नतमस्तक होतात.राष्ट्रसंतांच्या तपोभूमीचा विकास व्हावा म्हणून अनेक वर्षांपासून तालुक्यातील राजकीय पुढारी व स्थानिक लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत होते. तपोभूमीच्या विकासाकरिता वन जमिनीचा मोठा अडसर होता. त्यामुळे ही भूमी विकासापासून दूर राहत गेली. मात्र क्षेत्रातील तत्कालिन आमदारांनीही या भूमीच्या विकासाकरिता हातभार लावून योगदान देण्याचा प्रयत्न चालविला.तपोभूमीचा विकास व्हावा म्हणून प्रथमच आमदार कीर्तीकुमार भांगडिया व विधानपरिषद सदस्य मितेश भांगडिया यांनी सरकारकडे साकडे घातले. तपोभूमीला पर्यटन क्षेत्र घोषित करून विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पात तपोभूमीच्या विकासासाठी ३४ कोटी रुपयांची तरतूद केली. या निधीतून तपोभूमीत आजघडीला मोठ्या प्रमाणात विकास कामे केली जात आहेत. तपोभूमीच्या विकासाकरिता ३४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यापैकी १५ कोटींची विकासकामे प्रगतिपथावर आहेत. त्यामध्ये सभागृह, ध्यान केंद्र, अंतर्गत रस्ते, भवन निवास, विद्युत यासह इतर कामे केली जात आहेत. सभागृह व ध्यान केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. तर २० एकर जागेमध्ये स्व.उत्तमराव पाटील वनउद्यानाचे कामही प्रगतिपथावर आहे.