नवाब मलिक : राष्ट्रीय मुस्लिम हक्क संघर्ष समितीचे आयोजनचंद्रपूर : २०१४ मध्ये आघाडी सरकारने संवैधानिक अधिकाराअंतर्गत मुस्लम समाजाला दिलेल्या पाच टक्के आरक्षणाला युती सरकारने पुन: बहाल करण्याचा निर्णय घ्यावा. त्यापोटी पाच लाख मुस्लीम समाज बांधवासोबत मुख्यमंत्र्यांचा हार्दिक सत्कार करुन स्वागत केल्या जाईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले.स्थानिक नेहरु विद्यालय प्रांगणात राष्ट्रीय मुस्लिम हक्क संघर्ष समिती (महाराष्ट्र) घेतलेल्या विदर्भस्तरीय मुस्लिम आरक्षण परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी मलिक बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष हाजी सय्यद अनवर अली यांनी मुस्लिम समाजाला आरक्षण मिळेपर्यंत राष्ट्रीय मुस्लिम हक्क संघर्ष समिती हा लढा शेवटपर्यंत लढत राहील, असा निर्धार व्यक्त केला.विशेष अतिथी आ.बच्चू कडू यांनी मुस्लिम समाजाला शिक्षण घेवून संवैधानिक अधिकाराच्या लढ्यात व स्वच्छ राजकारणात आपले योगदान देण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय मुस्लिम बहुजन परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष प्रा. जावेद शेख यांनी मुस्लिम समाजाची वस्तुस्थिती मांडताना आणि १९४७ ते २०१६ पर्यंत समाजाची परिस्थिती किती हलाखीची झाली. त्यात राष्ट्रीय भूमिका कशी परिणामकारक होती, याचे विस्तृत विवेचन केले. नाशिकचे मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष अजिजखान पठाण यांनी मागील ६० वर्षांमध्ये धर्मनिरपेक्ष पक्षांनी मुस्लिम समाजाचा वापर केवळ मतांकरिता केल्याचा आरोप केला. धर्माच्या नावावर आरक्षण देता येत नाही म्हणणाऱ्या नेत्यांचा खरपूस समाचार घेत आमचा धर्म इस्लाम आहे आणि इस्लामला माणणारा समाज मुस्लिम आहे, हे स्पष्ट करीत मुस्लिमांचा धर्म इस्मा आहे. त्याची न्यायालयीन लढाई लढत असल्याचे त्यांनी नमूद केले.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आ. नाना शमकुळे व आ. बाळू धानोरकर यांनी संपूर्ण समाजांना त्यांचा संवैधानिक अधिकार मिळण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. या परिषदेमध्ये आरक्षणसंबंधी ठराव घेऊन मुख्यमंत्री आणि उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रमुखांना निवेदन पाठविण्यात आले. परिषदेत समितीचे महासचिव फिरोजखान पठाण यांनी आपले मत व्यक्त केले. प्रास्ताविक अॅड. रफिक शेख यांनी केले. संचालन नईमखान आणि आभार मुख्य संघटक मुश्ताक कुरेशी यांनी मानले. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता केंद्रीय उपाध्यक्ष जाकीर शेख, सचिव शाहिद कुरेशी, जिल्हा प्रभारी अश्फाक शेख, केंद्रीय सदस्य अकबर शेख, मजहर अली, शरीफ शेख, मेहमूद शेख, जैनुल आबेदिन, गयास सरफराज मेमन, शहर अध्यक्ष समीज शेख, यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
-तर मुस्लिमांतर्फे मुख्यमंत्र्यांचा सत्कार करणार
By admin | Published: October 26, 2016 1:20 AM