शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
4
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
5
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
6
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
7
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
8
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
9
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
10
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
11
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
12
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
13
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
14
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
15
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
16
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
17
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
18
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
19
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
20
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स

खत खरेदीतून अंगठा बाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 11:00 PM

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील खत विक्रेत्यांसाठी शासनाने ई-पास मशिन दिले होते. मात्र तांत्रिक कारणामुळे हे मशिन बिनकामी ठरले. त्यामुळे शेतकऱ्यांना खत खरेदी करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. यावर पर्याय म्हणून ई-आधार नंबरद्वारे खत सुरू करण्यात आली. यापुढे शेतकऱ्यांकडून अंगठा घेण्याची सक्ती राहिली नाही. ग्रामीण भागातील कृषी विक्रेत्यांनी शासनाच्या निर्देशांचे ...

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा : जिल्ह्यात खताचा मुबलक साठा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील खत विक्रेत्यांसाठी शासनाने ई-पास मशिन दिले होते. मात्र तांत्रिक कारणामुळे हे मशिन बिनकामी ठरले. त्यामुळे शेतकऱ्यांना खत खरेदी करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. यावर पर्याय म्हणून ई-आधार नंबरद्वारे खत सुरू करण्यात आली. यापुढे शेतकऱ्यांकडून अंगठा घेण्याची सक्ती राहिली नाही. ग्रामीण भागातील कृषी विक्रेत्यांनी शासनाच्या निर्देशांचे पालन करून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी खत उपलब्ध करून दिले नाही तर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.खरीप हंगामाकरिता जिल्ह्यातील शेतकरी खताची खरेदी करीत आहेत. रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर टाळावे, याकरिता शासनाने ५० ऐवजी ४५ किलोची गोणी तयार केली. याबाबत शेतकरी समाधानी आहेत. रासायनिक खतांमुळे शेतीचा पोत खराब होऊ नये, याकरिता कृषी विभागाने शेतकऱ्यांमध्ये जागृती घडविली होती. त्याचे चांगले परिणाम जिल्ह्यात दिसून येत आहेत. परंतु, ुसोयाबीन, कापूस, धान व अन्य कडधान्य पिकांसाठी कृषी तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार कमी मात्रेमध्ये रासायनिक तसेच मिश्र खतांचा वापर करणे गरजेचे आहे. पण अनुदानाच्या आमिषामुळे गैरव्यवहाराचे प्रकार घडत होते. शेतकऱ्यांना ही खते अनुदानावर दिली जातात. मात्र यापुर्वीच्या चुकीच्या पद्धतीमुळे कृषी व्यापाऱ्यांनाच मोठ्या प्रमाणात फायदा व्हायचा. हा गैरव्यवहार टाळण्यासाठी शासनाने परवानाधारक कृषी निविष्ठा विक्रेत्यांना ई-पास (पॉइंट आॅफ सेल) मशीन देण्याचा निर्णय घेतला होता. या मशिनद्वारेच शेतकऱ्यांना खत खरेदी करावी लागत होती. त्यावर अंगठा लावल्याशिवाय विके्रते शेतकऱ्यांना खत देत नव्हते. जिल्ह्यातील दुर्गम भागातील कृषी केंद्रांमध्ये ई-पास मशिन वारंवार बंद पडण्याच्या घडत आहेत. परिणामी शेतकऱ्यांना खत खरेदी करण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे. पास मशिनच्या नियमामुळे शेतकऱ्यांचा त्रास वाढला. तर दुसरीकडे काही दुकानांमध्ये हीच मशिन नसल्याने खत खरेदी करण्याचे अधिकृत मार्ग बंद झाले होते. शेतकऱ्यांनी याविरूद्ध तक्रारी केल्याने आधार क्रमांकावर रासायनिक व मिश्र खते देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे खत खरेदीसाठी विक्रेत्यांनी मशिनवर अंगठा ठेवणे सक्तीचे केले. यातून समस्यांमध्ये वाढच झाली. दुकानदारांनी पास मशिन बंद असल्याचा कारणावरून शेतकऱ्यांना परत पाठवू लागला. ही अडचण आता दूर झाली आहे.नादुरुस्त मशिनमुळे विक्रेते त्रस्तकृषी निविष्ठा विक्रीकरिता शासनाने ई-पास मशिन पुरविले होते. पण, जिल्ह्यातील बहुतांश विक्रेत्यांकडील मशिन बंद असल्याचा आरोप कृषी विक्रेत्यांनी केला. खत खरेदीकरिता आधार कार्डचा पर्याय स्वीकारण्यात आला. परंतु, यासंदर्भात पत्र न मिळाल्याने विक्रेत्यांमध्ये संभ्रम आहे. शासकीय यंत्रणेकडून मशिन दुरुस्त करण्याची मागणी कृषी विके्रत्यांनी केली आहे.