लोकमत न्यूज नेटवर्कमाजरी : वेकोलि माजरीचे अधिकारी नेहमी खोटे आश्वासन देवून वृद्धाश्रमातील गोरगरीबांची थट्टा करीत असल्याचा आरोप करून सोनू येवले यांनी वृद्धाश्रमातील महिलांसह ५ मेपासून वेकोलि मुख्यालय कुचना समोर आमरण उपोषण सुरू केले होते. त्यानंतर वेकोलिच्या अधिकाऱ्यांनी मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर सदर उषोषण स्थगित केले. यावेळी वृद्धाश्रमासाठी आर्थिक मदत म्हणून ४० हजार रुपये व खोल्यांचे बांधकाम करून देण्याचे आश्वासन देण्यात आले.
वेकोलिच्या आश्वासनानंतर वृद्धांचे आंदोलन स्थगित
By admin | Published: May 11, 2017 12:39 AM