शहरं
Join us  
Trending Stories
1
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
2
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?
3
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
4
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
5
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
6
900% पर्यंत खटा-खट परताना देणारे शेअर धडा-धड आपटले! 6 महिन्यात नाव बुडाली, लोकांवर डोक्याला हात लावायची वेळ आली
7
रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान
8
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
9
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड
10
6 दिवसात ₹20 लाख कोटी स्वाहा...! भारत सोडून कोण-कोण जातय चीनला?
11
SBI मध्ये होणार १० हजार पदांसाठी भरती; कधी जारी केली जाणार अधिसूचना?
12
पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार! Team India देखील जाणार? PCB ने सांगितलं कारण
13
कोलकाता प्रकरणी मोठा खुलासा! "महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार..." CBI'ने चार्जशीट केले दाखल
14
Kapil Honrao : "मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
15
"कुठे आहेत ते... त्यांना बोलवा", काँग्रेस आमदार मंचावरूनच सरकारी अधिकाऱ्यांवर संतापले
16
सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?
17
ही भविष्यवाणी खरी झाल्यास २०२५ पासून होणार मानवाच्या अंताची सुरुवात, नेमकं काय घडणार
18
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
19
Gold Price: सोनं खरेदीच्या विचारात आहात? मग थोडं थांबा, ₹५००० पर्यंत घरण्याची शक्यता, 'या'वेळी येणार करेक्शन
20
पाकिस्तानातील हरवलेले मुख्यमंत्री सापडले! थेट विधासभेत लावली हजेरी, घटनाक्रमही सांगितला

पाणी पुरवठ्याबाबत पुन्हा मनपाची चालढकल

By admin | Published: September 20, 2016 12:39 AM

चंद्रपूरकर सध्या अनियिमित पाणी पुरवठ्यामुळे त्रस्त झाले आहेत. ठेकेदाराची मनमानी कमी होण्याऐवजी वाढतच आहे.

ठोस निर्णय नाही : ‘उज्ज्वल’ ला मनपाकडून अभयचचंद्रपूर : चंद्रपूरकर सध्या अनियिमित पाणी पुरवठ्यामुळे त्रस्त झाले आहेत. ठेकेदाराची मनमानी कमी होण्याऐवजी वाढतच आहे. मनपाच्या प्रत्येक आमसभेत याविषयी जाब विचारला जातो. मात्र उपाययोजना होत नाही. या मुद्यावर चर्चा करण्यासाठी सोमवारी महानगरपालिकेत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. मात्र यावेळीदेखील मनपा प्रशासनाकडून ठोस निर्णय होऊ शकला नाही. विशेष म्हणजे, कंत्राट रद्द करण्याची अनेक नगरसेवकांची मागणी असतानाही मनपाने उलट वीज दर वाढल्यामुळे पाण्याच्या टाक्या पूर्णपणे भरल्या जात नाही, त्यामुळे वाढलेल्या वीज दराची रक्कम सबंधित कंत्राटदाराला देण्याचा निर्णय या सभेत घेतला.नवीन योजना सुरू होईपर्यंत पुन्हा एकही नळ कनेक्शन देऊ नये, असेही यावेळी ठरविण्यात आले. शहराला पाणी पुरवठा करण्याचे कंत्राट उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. मात्र ही कंपनी मागील दोन वर्षांपासून शहराला व्यवस्थित पाणी पुरवठा करीत नाही. पाईपलाईन ठिकठिकाणी लिकेज आहे. मात्र त्याची दुरुस्ती केली जात नाही. मनपाची निवडणूक लवकरच होणार आहे. त्यामुळे नगरसेवक अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना पाणी द्या, अशी त्यांची मागणी आहे. आजच्या सभेतही नगरसेवक पाणी पुरवठ्याबाबत विविध सूचना देत राहिले. माजी उपमहापौर संदीप आवारी यांनी संबंधित कंत्राटदाने किती सूचनांचे पालन केले, याविषयी जाब विचारला. त्यावर अभियंता गादेवार म्हणाले, कंत्राटदाराला २७ मुद्यांवर सुधारणा करण्याचे सूचविले होते. मात्र बहुतांश बाबीत ठेकेदाराने सुधारणा केली नाही, असे सांगितले. नळ कनेक्शनसाठी ठेकेदार अधिकचा पैसा वसूल करीत असल्याची माहिती सभागृहात दिल्यानंतर नगरसेवक रामू तिवारी यांनी, पुरावा असतानाही मनपा याबाबत गुन्हा दाखल का करीत नाही, असा प्रश्न उपस्थित केला. यावर करारात तसे नमूद नाही, असे उत्तर आयुक्तांनी दिले. नगरसेविका सुनिता लोढिया यांनी नवीन पंप घेण्याची सूचना केली, बलराम डोडानी यांनी यावर निर्णय घेण्यासाठी एक समिती गठीत करण्याची सूचना केली. नगरसेवक संदीप आवारी पाणी पुरवठ्याबाबत अतिशय आक्रमक दिसत होते. पाणी पुरवठा योजना मनपाने आपल्या हातात घ्यावी, अशी मागणी काही नगरसेवकांनी केली. यावर माहिती देताना आयुक्त संजय काकडे म्हणाले, ही योजना चालवायला २४५ कर्मचाऱ्यांची गरज पडेल, जी मनपा आज पूर्ण करू शकत नाही. याशिवाय सध्या नागरिकांकडून १०५० रुपये जलकर वसूल केला जात आहे. योजना चालविली तर अडीच हजार रुपये जलकर घ्यावा लागेल, अशी माहितीही त्यांनी दिली. (शहर प्रतिनिधी)आवारी व वैद्य यांच्यामध्ये बाचाबाचीसभेमध्ये अमृत योजनेवर चर्चा सुरू होताच नगरसेवक संजय वैद्य यांनी जुन्या योजना कशा अयशस्वी झाल्या, हे सांगणे सुरू केले. यावर उपमहापौर संदीप आवारी यांनी यासाठी राष्ट्रवादीचे नेतेच जबाबदार असल्याचे सांगितले. त्यामुळे संजय वैद्यदेखील भडकले. दोघांमध्ये यावरून शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर वैद्य यांनी आपला अमृत योजनेला विरोध नसून धानोरा येथून पाणी आणण्याच्या प्रस्तावाला विरोध असल्याचे सांगितले. यात मनपाला ३० कोटींचा फटका बसेल. इरई धरणातून सीटीपीएस दरवर्षी १०० दलघमी पाण्याची उचल करते. ८० ते १०० दलघमी पाणी धरणात शिल्लक राहते. शहराला २५ ते ३० दलघमी पाणी पुरसे आहे. या धरणातूनच मनपाने पाणी घ्यावे. कुणी अडथळा आणल्यास मनपा याचिकादेखील दाखल करू शकते. वाटल्यास जलसंपदा मंत्रालयाशी मनपा प्रशासनाने चर्चा करावी, असेही संजय वैद्य यांनी सांगितले. महानगरपालिकेवर मोर्चापाणी पुरवठ्याबाबत आयोजित विशेष सभा सुरू असतानाच पाणी पुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या श्यामनगर, इंदिरानगर येथील नागरिकांनी मनपा कार्यालयावर मोर्चा आणला. दुपारी १२ वाजता श्यामनगर येथील आंबेडकर चौकातून हा मोर्चा निघाला होता. जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर मोर्चेकरी मनपा कार्यालयावर धडकले. तिथे जोरदार घोषणा दिल्या.