आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा जिल्ह्यासह विदर्भात वादळी पावसासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने वादळी पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. शेतात सध्या कापूस, गहू, मिरची, हरभरा पीक असल्याने क्षणार्धात पीक उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला असून शेतकºयांच्या काळजाची धडधड पुन्हा वाढली आहे.दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने पावसामुळे शेतातील पीक पूर्णत: मातीमोल होण्याचा धोका आहे. यावर्षी बोंड अळीने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले आहे. बोंड अळीने यावर्षी मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट झाली आहे. शेतमालाला पाहिजे त्या प्रमाणात दर नसल्याने शेतकरी पुरता कोलमडून पडला आहे. रब्बी माल शेतकºयांच्या अजूनही शेतात आहे. कापूस वेचणीला अजूनही मजूर मिळत नसल्याने लाखो रुपयांचा कापूस शेतातच आहे. १० ते १३ फेब्रुवारीपर्यंत चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा जिल्ह्यासह विदर्भात वादळी पावसासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे.कापूस, गहू, हरभरा, मिरची ही नगदी पिके निघायला पुन्हा काही दिवसांचा कालावधी आहे. परंतु वातावरणात अचानक बदल झाल्याने कोणत्याही क्षणी पाऊस येण्याचा धोका निर्माण झाला आहे.शेतकऱ्यांवर आलेले अस्मानी आणि सुल्तानी संकट शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. यावर्षी शेतकरी पार काकुळतीला आला आहे. नेहमीप्रमाणेच यावर्षी उत्पादनापेक्षा खर्च जास्त झाला.बोंड अळीने कापसाला पुर्णत: खाऊन टाकले. कापसाचे ५० टक्के उत्पादनही शेतकºयांना घेता आले नाही. कर्जाचा भार शेतकऱ्यांच्या डोईवर असतानाच कापसाचे दर चारशे-पाचशे रुपयांनी खाली आले. त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक बजेट पुरता कोलमडून गेला आहे. ढगाळ वातावरणाने वादळी पावसासह जिल्ह्यात गारपीट होण्याची दाट शक्यता असून शेतपिकांना चांगलाच तडाखा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा अश्रूयावर्षी शेतकºयांची निसर्ग जणू परीक्षाच घेत असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती फार वाईट आहे. मोठ्या प्रमाणात यावर्षी उत्पादनात घट झाली आहे. ढगाळ वातावरणाने शेतकºयांची चिंता पुन्हा वाढली आहे. लाखो रुपयांचा शेतमाल शेतात असल्याने कोणत्याही क्षणी गारपीट झाली तर शेतकºयांच्या हाती काहीच लागणार नाही.सध्या शेतकऱ्यांच्या शेतात कापूस, गहू, हरभरा, मिरची, तूर आदी पिके आहेत. वातावरणात अचानक बदल झाल्याने केव्हाही गारपीट होऊन शेतातील पीक मातीमोल होण्याचा धोका निर्माण झाला आहे.- भास्कर जुनघरी,शेतकरी, गोवरी.
शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 11:54 PM
चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा जिल्ह्यासह विदर्भात वादळी पावसासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
ठळक मुद्देढगाळ वातावरण : कापूस, गहू, मिरची, हरभरा पीक धोक्यात