वरोरा : येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष वरोराच्या वतीने तालुक्यात कार्यरत असलेल्या कृषी व पशू सखींची एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. ग्रामीण कुटुंबाचे उत्पन्न वाढावे या उद्देशाने उमेद अभियान गावागावांत कार्यरत आहेत. अभियानात सहभागी कुटुंबाची उपजीविका समृद्ध व्हावी यासाठी कृषी व पशू सखी, इतर केडरच्या माध्यमातून शेती शाळा, पशुशाळा, विविध प्रात्यक्षिक आदी सभा, इ उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये पशुसंवर्धन व कृषी विभागाचा समन्वय निर्माण होऊन अभियानाचे उपक्रम अधिक गतिमान व्हावे यासाठी कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी वरोरा पंचायत समिती उपसभापती संजीवनी मिलिंद भोयर, पंचायत समिती सदस्य पार्वता ढोक, पशुधन विकास अधिकारी आनंद नेवारे, तालुका अभियान व्यवस्थापक अरुण चौधरी, तालुका व्यवस्थापक प्रशांत काकडे, प्रभाग समन्वयक गणवीर (बल्लारपूर) यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. तालुक्यातील गावागावांत अभियानाच्या माध्यमातून शासकीय विविध विभाग आणि उमेद गट, ग्राम संघ, प्रभाग संघ यांचे कार्य अधिक प्रभावी व्हावे यासाठी आवश्यक सहकार्य केले जाईल असे सांगितले. कार्यशाळेत तालुक्यातील १७ कृषी , १४ पशू सखी, कृषी, पशु, मत्स्य व्यवस्थापक सहभागी होते.
कृषी दिनानिमित्त वरोरा येथे कृषी व पशू सखींची कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2021 4:19 AM