शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

खरिपासाठी कृषी बीजोत्पादन मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 10:59 PM

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: राज्य बियाणे महामंडळाच्या वतीने खरीप २०१८-१९ हंगामासाठी धानाचे विविध प्रमाणित वाण तयार आहे. त्यामुळे बियाणे उत्पादनाकरिता अग्रीम आरक्षण योजना सुरुझाली असून शेतकऱ्यांनी नाव नोंदवून दर्जेदार उत्पादनास योगदान देण्यास पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.महाराष्ट्र बियाणे मंडळाने सुरू केलेल्या बीजोत्पादन कार्यक्रम १० मे २०१८ पर्यंत सुरू राहणार आहे. ...

ठळक मुद्देबियाणे मंडळाचा उपक्रम : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नाव नोंदणी करावी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: राज्य बियाणे महामंडळाच्या वतीने खरीप २०१८-१९ हंगामासाठी धानाचे विविध प्रमाणित वाण तयार आहे. त्यामुळे बियाणे उत्पादनाकरिता अग्रीम आरक्षण योजना सुरुझाली असून शेतकऱ्यांनी नाव नोंदवून दर्जेदार उत्पादनास योगदान देण्यास पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.महाराष्ट्र बियाणे मंडळाने सुरू केलेल्या बीजोत्पादन कार्यक्रम १० मे २०१८ पर्यंत सुरू राहणार आहे. प्रती एकर नाममात्र आरक्षण शुल्क भरून जिल्ह्यातील शेतकºयांना बीजोत्पादन योजनेत सहभागी होता येईल. या करिता बीजोत्पादक शेतकऱ्यांनी सातबारा किंवा आठ- अ, आधार कार्ड व बँक पासबुकची प्रत देणे महामंडळाला द्यावे लागेल. तीन एकर पेक्षा कमी क्षेत्रावरील शेतकºयांना बिजोत्पादन देता येणार नाही. एका गावात सर्व वाण मिळून कमीत कमी ५० एकर क्षेत्रावर बीजोत्पादन कार्यक्रम होणार असून मूल येथील बीज प्रक्रिया केंद्र परिसरातील बीजोत्पादकांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. मोहिमेदरम्यान ज्या गावात संपूर्ण पायाभूत, प्रमाणित, सत्यदर्शक बिजोत्पादन मिळून कमीत कमी ५१ ते १०० हेक्टर क्षेत्रावर कार्यक्रम आयोजित करुन नोंदणी होईल.त्या गावातील बीजोत्पादकांना भरलेल्या तपासणी शुल्काच्या रकमेमधील ५० टक्के रक्कम विशेष सवलत देण्यात येणार आहे. बीयाण्याच्या अंतिम शोधना सोबतची ही रक्क शेतकऱ्यांनी परत मिळेल. एका गावामधून तीन ते दोन हजार क्विंटल व त्यापेक्षा जास्त बियाणे उत्पादन झाले असेल तर त्या गावातील ग्रामपंचायत, कृषी शिक्षण संस्था, विश्वस्थ संस्थेचा महाबीजच्या वतीने सत्कार करण्यात येईल. ग्राम बीजोत्पादन संकल्पना वाढीसाठी २१ हजार व १५ हजार रूपयांचे रोख बक्षिस देण्यात येईल. अंतिम पात्र बियाणे खरेदी धोरण हे जिल्ह्यातील प्रमुख तीन कृषी उत्पन्न बजार समितीमधील १५ डिसेंबर २०१८ ते १५ जानेवारी २०१९ या कालावधीतील भावाची सरासरी अधिक २० टक्के (प्रमाणित दर्जा) प्रोत्साहनपर रक्कमेनुसार शोधन केले जाणार आहे.शासनाकडून बोनस मिळाल्यास वाहतूक खर्च पात्र बियाण्यांवर प्रती क्विंटल ३५ रुपये याप्रमाणे शोधन करण्यात येईल, अशी माहितीही जिल्हा व्यवस्थापक एन. पी. खांडेकर यांनी प्रसिद्धिपत्रकातून दिली. ज्या बिजोत्पादकांचे लॉट बियाण्यात पहिल्या ग्रेडिंग तसेच चाचणीमध्ये ओडीव्ही प्रती किलो १० पर्यंत असेल त्यांना ३५ रुपये प्रती क्विंटल अतिरिक्त प्रोत्साहन पास बियाण्यावर देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे चाचणीदरम्यान निम्नस्तर बियाणे निघाल्यास त्या शेतकऱ्यांनाही गुणवत्तेकरिता अतिरिक्त प्रोत्साहनपर रक्कम पास दिले जाणार आहे.जिल्ह्यातील बिजोत्पादक शेतकऱ्यांनी आधुनिक व जादा उम्पादन देणाऱ्या बियाणांची लागवड करून उत्पादनात वाढ करावी. यासंदर्भातील विविध उपक्रमात सहभागी व्हावे. तसेच जिल्ह्यातील बिजोत्पादक शेतकऱ्यांनी आरक्षणाकरिता महाबीज जिल्हा कार्यालयाचे सहायक क्षेत्र अधिकारी खांदेभराड यांच्याशी संपर्क करावा, असेही प्रसिद्धित्रकातून कळविण्यात आले आहे.शेतकऱ्यांना मिळणार पुरस्कारखरिप हंगामातील कृषी बिजोत्पादन मोहिमेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना लागवड आणि अन्य विविध पैलुंची माहिती तज्ज्ञांकडून दिली जाणार आहे. उत्पादन वाढीसाठी दर्जेदार बियाणे उपलब्ध व्हावे. शेतकऱ्यांना नव्या तंत्राची माहिती मिळावी, या हेतूने ही मोहीम प्रत्येक हंगामादरम्यान राबविण्यात येते. मोहीमेत सहभागी होऊन दर्जेदार बियाणे उत्पादन करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकरी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येते. मागील हंगामातही शेतकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला होता.