विजय वडेट्टीवार ; कोरपना येथे शेतकरी मेळावा
कोरपना : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अर्थव्यवस्थेचे चक्र कोलमडले असताना शेती आणि शेतकरी यामुळेच अर्थव्यवस्था टिकून असल्याचे मत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी कोरपना येथे आयोजित शेतकरी मेळावाप्रसंगी व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजुराचे आमदार सुभाष धोटे, प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूर वणी लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विठ्ठल थिपे, राजुराचे नगराध्यक्ष अरुण धोटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीधरराव गोडे, उपसभापती योगेश्वर गोखरे, जिल्हा बँकेचे संचालक विजय बावने, जिल्हा परिषद सदस्य कल्पना पेचे, विना मालेकर, पंचायत समिती उपसभापती सिंधुताई आस्वले, श्याम रणदिवे, संभा कोवे, माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तम पेचे, माजी नगराध्यक्ष कांता भगत, तालुका महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष ललिता गेडाम, माजी नगर उपाध्यक्ष मनोहर चने, शहराध्यक्ष सुनील बावणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अरुण निमजे, आबिद अली आदी मान्यवर उपस्थित होते.
शेतकरी मेळाव्यापूर्वी कोरपना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन कार्यालय इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन उमेश राजूरकर तर आभार सचिव कवडू देरकर यांनी मानले.