मोबाइल सर्वसामान्यांची गरज झाली आहे. प्रत्येक व्यक्तीकडे स्वतंत्र मोबाइल आला आहे. पूर्वी मोबाइलचा वापर सार्वत्रिक होण्यापूर्वी बहुतेकांना आपले आप्तेष्ट, नातेवाइक, मित्र यांचे मोबाइल नंबर मुखपाठ असायचे. आता मोबाइलचा वापर वाढला आहे. एकदा मोबाइलमध्ये नंबर सेव्ह केल्यानंतर दुसऱ्यांदा मोबाइल नंबर डायल करण्याची गरज नसते. सरळ मोबाइलमध्ये नाव सर्च करून फोन लावला जातो. त्यामुळे आपण मेंदूला त्रास देत नाही. परिणामी, स्मरणशक्तीचा वापर कमी होत आहे. त्यामुळे अनेकांना स्वत:चाही नंबर पाठ राहत नसल्याचे अनेकदा बघायला मिळत आहे. गुरुवारी लोकमत चमूने दहा जणांना आपल्या पत्नीचा नंबर पाठ आहे का, असे विचारत दहापैकी सहा जण चाचपळायला लागले. तर चार जणांनी मोबाइल मुखपाठ असल्याचे समोर आले.
बॉक्स
तरुणांपासून वृद्धांपर्यंत सारे सारखेच
लोकमतच्या रिॲलिटी चेकमध्ये तरुणपासून वृद्धांपर्यंत अशा दहा जणांना प्रश्न विचारण्यात आले. मात्र सर्वच वयोगटातील पतीदेवाची व्यवस्था सारखीच आढळून आली. मोबाइलमध्ये नंबर सेव्ह आहे. तर मुखपाठ ठेवण्याची काही आवश्यकता नसल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली. परंतु, एखाद्या वेळेस कुणी नंबर विचारला तर मोबाइलमध्ये तपासून सांगावे लागते. त्यावेळेस थोडेसे गिल्टी फील होत असल्याचेही काहींनी सांगितले.
बॉक्स
बायकांनाही पतीदेवाचा नंबर आठवेना
मागील दहा ते बारा वर्षांपूर्वी मोबाइल घेतला. तेव्हापासूनच नंबरच फेव्हरेटमध्ये सेव्ह आहे. त्यामुळे तो एकच नंबर दिसत असतो. त्यामुळे सहज कॉल करता येतो. पाठ करण्याची काही गरज भासली नाही.
- एक गृहिणी
------
पूर्वी नंबर पाठ होता. परंतु, आता नंबरच सेव्ह असल्याने मोबाइलवर सर्च मारूनच कॉल करीत असते. त्यामुळे पूर्णपणे नंबर आठवत नाही. त्यांचे दोन नंबर असल्याने एकच नंबर लक्षात आहे.
-एक गृहिणी
-----
बॉक्स
पोरांना मात्र आई-बाबांचा नंबर पाठ
लहान असतानाच पापांनी मोबाइल नंबर पाठ करवून घेतला होता. त्यामुळे मम्मी व पापांचा नंबर मुखपाठ आहे. घरून मम्मी किंवा पप्पांना कॉल करताना लॅन्डलाइनवरुन नंबर डायल करीत असतो. त्यामुळे नंबर लक्षातच आहेत.
मुलगा
-------
शाळेतील आयकॉर्डवर बाबांचा नंबर आहे. त्यामुळे तो मुखपाठ आहे. तसेच कोणीही नंबर विचारला तर बाबांचाच देत असतो. त्यामुळे बाबांचा नंबर पाठच आहे. बुकामध्ये आई आणि बाबांचा मोबाइलचा नंबर लिहून आहे.
मुलगा
-------
लोकमत जनता कॉलेज चौक
खासगी कंपनीत काम करणाऱ्या एका ४५ वर्षीय व्यक्तीला आपल्या बायकोचा नंबर लक्षात नव्हता. मात्र मुलीचा नंबर मुखपाठ होता. मुलीच्या मोबाइलमध्ये रिचार्ज करताना नंबरची आवश्यकता असते. त्यामुळे नंबर पाठ असल्याचे सांगितले.
दोन जणांना आपल्या कुटुंबीयातील एकाही व्यक्तीचा नंबर माहिती नव्हता. परंतु, मित्राचा नंबर कॉलेजपासूनच पाठ असल्याचे त्यांनी सांगितले.
एका शिक्षकाला प्रश्न केला असता, त्याने आपल्या आई-वडिलांसह, पत्नी, मुलगी व मुलाचा नंबरही पाठ असल्याचे सांगितले. कधी केव्हा कशी गरज पडेल सांगता येत नाही. त्यामुळे नंबर लक्षात ठेवले असल्याचे त्या शिक्षकांनी सांगितले.
बॉक्स
पोरांना आठवते मोठ्यांना का नाही
लहान मुले आई-वडील यांना जास्त कॉल करीत असतात. एखाद्या वेळेसच आपल्या मित्र किंवा मैत्रिणीला करीत असतात. त्यामुळे लहान मुलांना नंबर लक्षात असतात. याउलट मोठ्या लोकांचा संपर्क अधिक असल्याने त्यांना नंबर लक्षात राहत नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.