चंद्रपूर : जिल्ह्यात प्रदूषणाचा गंभीर प्रश्न उभा आहे. त्यामुळे प्रदूषणावर वेळीच आळा न घातल्यास भविष्यात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. यासंदर्भात ठोस उपाययोजना कराव्या यासाठी खासदार हंसराज अहीर यांनी दिल्ली येथे तर, आमदार मुनगंटीवार यांनी मुंबई येथे केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेऊन समस्या अवगत करून दिली. सोबतच येथे पाहणी दौरा करावा, अशी मागणी केली.जिल्ह्यात मोठ्या संख्येने उद्योग आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचे संच १ व २ हे फार जुने झाले आहे. ते चंद्रपूर शहराच्या प्रदूषणात प्रचंड भर घालत आहेत. त्यामुळे आरोग्यास घातक ठरत असल्याने सदर संच बंद करावे, अशी मागणी खासगार हंसराज अहीर यांनी केली.महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने देखील चंद्रपूर महाऔष्णिक केंद्राचे संच १ व २ हे चंद्रपूर शहराचे प्रदूषणात मोठ्या प्रमाणात भर घालत असल्याने ते बंद करावे, अशी शिफारस केली आहे. प्रदूषण पातळी १०० एमजी, एनएम ३ ग्राह्य असूनही या संचाची प्रदूषण पातळी ३८३.९१ व ६४२.९२ एमजी, एनएम ३ एवढी आहे. चंद्रपूर क्षेत्राला प्रदूषणात उच्चांक गाठण्यात या संचांचा मोठा वाटा आहे. यामुळे नागरिकांना विविध गंभीर आजारांना बळी पडावे लागत आहे.मुनगंटीवार यांची जावडेकर यांच्याशी चर्चाभाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेतली. चंद्रपूर जिल्ह्यातील हुमन सिंचन प्रकल्पाच्या नेट प्रेझेंट व्हॅल्युच्या रकमेचा भरणा करण्यासंदर्भात उद्भवलेल्या अडचणीबाबत त्यांनी ना. जावडेकर यांच्याशी चर्चा केली. तसेच प्रदूषणाचा जिल्ह्यात गंभीर विषय आहे. त्यामुळे यासंदर्भात सविस्तर माहितीसाठी चंद्रपूर येथे येण्याचे त्यांनी मागणी केली. (नगर प्रतिनिधी)
अहीर-मुनगंटीवार यांची पर्यावरण मंत्र्याशी चर्चा
By admin | Published: June 25, 2014 11:42 PM