चंद्रपूर : इनरव्हील क्लब ऑफ स्मार्ट सिटीच्या वतीने स्थानिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एड्स जनजागृती मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. यावेळी अनेकांनी या मार्गदर्शन कार्यक्रमाचा लाभ घेतला. मार्गदर्शन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक शल्य चिकित्सक डॉ. दुधे, तहसीलदार जगताप उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. दुधे म्हणाले, एड्स हा इतर आजारांसारखाच आजार आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित औषधोपचार, मेडिटेशन, प्राणायाम आदीच्या माध्यमातून निदान करता येते. बहुतांश रुग्ण औषध खाण्यासाठी आढेवेढे घेतात. त्यामुळे धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नियमित औषधोपचार घ्यावा, असा सल्ला दिला. तहसीलदार जगताप यांनी राजीव गांधी योजनेबाबत माहिती देताना अर्ज भरून आयडी काढण्याचे आवाहन केले. यावेळी क्लबच्या पीडीसी विद्या बांगडे, डिस्ट्रिक्ट ॲडिटर रमा गर्ग, क्लबच्या अध्यक्ष कल्पना गुप्ता, पूनम कपूर आदी उपस्थित होते.
इनरव्हील क्लबतर्फे एड्सबाबत जनजागृती मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 4:37 AM