लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : समाजातील बालकावर संस्कार करीत पुढील शिक्षणाचा पाया मजबूत करण्याचे काम अंगणवाडी केंद्रातून सेविकांद्वारे केले जाते. मात्र अंगणवाडी सेविकांना नाममात्र मानधन देवून त्यांची शासनाद्वारे बोळवण करण्यात येत आहे. या अल्पश: मानधनामुळे अंगणवाडी सेविका मदतनीस आर्थिक विवंचनेत जीवन जगत आहेत. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना दर्जा वेतनश्रेणी, शासकीय कर्मचाºयांचा दर्जा देण्याच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी सोमवारी रस्त्यावर उतरुन चिमूर पंचायत समितीवर मोर्चा नेला. दरम्यान व आपल्या मागणीचे निवेदन प्रकल्प अधिकाररी मार्फत राज्याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री, महिला व बालविकास मंत्री, प्रधान सचिव आदींना दिले.अगंणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र सलंग्न हिंद मजदूर सभाचे कार्याध्यक्ष मोहम्मद इकलाख कुरेशी यांच्या नेतृत्वात सदर मोर्चा काढण्यात आला.एकात्मिक बालविकास योजना या केंद्रपूरस्कृत योजना असून या योजनाची सुरवात १९९५ पासून महाराष्ट्रात झाली. या योजनेअंतर्गत गावागावातील ० ते ६ वयोगटातील बालकांना पोषण आहार, तसेच शिक्षणाचे धडे देन्याचे कार्य अंगणवाडी सेविकांकडून करण्यात येत आहे. मात्र या कामाचा अंगवाडी सेविकांना अत्यल्प मानधन देण्यात येते. त्यामूळे अंगणवाडी सेविका व मदतनीसाचे परिवार आर्थिक विवंचनेत जिवण जगत आहे. मानधन वाढीसाठी अनेक आंदोलने मोर्चे निवेदन केली मात्र शासनाला तोडगा काढला नाही. त्यामूळे जिल्ह्यातील अंगणवाडी सेवीकांनी बेमुदत संप सुरु केला आहे. सेवानिवृत्त कर्मचाºयांना एक रक्कमेचा लाभ देण्यात यावा , मिनी अंगणवाडीला पूर्ण अंगणवाडीचा दर्जा देण्यात यावा, मानधन प्रवास बैठक भत्ता, आहाराचे अनुदान इंधन भत्ता नियमीत दयावा, या मागण्या घेऊन सेविकांचा मोर्चा पंचायत समितीवर धडकला व मागण्याचे निवेदन बालविकास प्रकल्प अधिकाºयाच्या मार्फतीने राज्याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री महिला व बाल विकास मंत्री व प्रधान सचिव यांना देण्यात आले. शिष्टमंडळात मो.ईकलाख कुरेशी, माधूरी वीर, देवकी प्रधान, शकुंतला गंम्पावार, सविता चौधरी, इंदीरा आत्राम, अन्नपूर्णा इरादेवे तसेच ब्रम्हपूरी, नागभीड, सिंदेवाही, चिमूर, वरोरा, भद्रावती येथील अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
चिमुरात अंगणवाडी सेविकांचा पंचायत समितीवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 12:01 AM
समाजातील बालकावर संस्कार करीत पुढील शिक्षणाचा पाया मजबूत करण्याचे काम अंगणवाडी केंद्रातून सेविकांद्वारे केले जाते.
ठळक मुद्देमागण्यांची पूर्तता करा : प्रकल्प अधिकाºयांना निवेदन