यशवंत घुमेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: हौसेला मोल नसते, असे म्हणतात. भद्रावती येथील राजू सपकाळ याच्या आॅटोरिक्षाकडे पाहिल्यावर त्याची प्रचिती आल्याशिवाय राहात नाही. राजूने आपल्या आॅटोरिक्षात जीव ओतून त्याला चक्क वातानुकूलित केला आहे. आॅटोरिक्षाच्या भाऊगर्दीत आपल्या आॅटोचे आगळेवेगळे स्थान निर्माण केले आहे.एक दिवस राजूने नेटवर कर्नाटक राज्यातील वातानुकूलित आॅटो पाहिला. आपणही तसाच आॅटो तयार करावा, अशी इच्छाशक्ती जागवून त्याने भद्रावती ते कर्नाटकातील बेलगम हे बाराशे ते साड बाराशे किमी अंतर आॅटोने गाठले. त्यासाठी त्याने स्वत:ची दुचाकी विकली. पत्नीच्या बचतगटांकडून कर्ज घेतले. आणि आर्थिक पदरमोड करून आपल्या आॅटोला वातानुकूलित बनवले. सुमारे दीड ते दोन लाख रुपये जादा खर्च करून त्याने सामान्य आॅटोला आरामदायी स्वरूप दिले. बंद दरवाजे, आरामदायी बैठक, कारचे अत्याधुनिक लाईट्स, स्ट्रॉंग सस्पेंशन, इको साऊंड सिस्टीम यामुळे हा आॅटो सर्वांचे वेधून घेतो. सुविधापूर्ण असला तरी त्याचे भाडे मात्र इतर आॅटो एवढेच असल्याने एकदा यातून सवारी केलेले ग्राहक पुन्हा सेवेसाठी राजूकडून मोबाईल नंबर मागून सेवेची हमी घेतात. निदान विदर्भात तरी अशाप्रकारचा अद्ययावत आॅटो आपल्याच शहरात एकमेव असल्याचे राजू अभिमानाने सांगतो. वयाच्या अठराव्या वर्षांपासून या व्यवसायात कार्यरत राजूचा चार महिन्यांपूर्वी आटोत विसरलेले एक लाख रुपये व सोन्याचे दागिने प्रामाणिकपणे ग्राहकाला परत केले होते. याबद्दल तत्कालीन ठाणेदार विलास निकम व तहसीलदार सचिन कुमावत यांच्या हस्ते त्याचा सत्कारही झाला होता, हे विशेष.आपण ज्या क्षेत्रात काम करतो. त्यात काहीतरी आगळेवेगळे करावे आणि नावलौकिक मिळवावा, अशी इच्छा होती. म्हणून आर्थिक पदरमोड करून वातानुकूलित आॅटो बनवला. यातून प्रवास करताना ग्राहक खूश होतात. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून मला आनंद होतो.- राजू सपकाळ, आॅटोचालक, भद्रावती.
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीत धावतो वातानुकूलित आॅटो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 2:18 PM
यशवंत घुमेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: हौसेला मोल नसते, असे म्हणतात. भद्रावती येथील राजू सपकाळ याच्या आॅटोरिक्षाकडे पाहिल्यावर त्याची प्रचिती आल्याशिवाय राहात नाही. राजूने आपल्या आॅटोरिक्षात जीव ओतून त्याला चक्क वातानुकूलित केला आहे. आॅटोरिक्षाच्या भाऊगर्दीत आपल्या आॅटोचे आगळेवेगळे स्थान निर्माण केले आहे.एक दिवस राजूने नेटवर कर्नाटक राज्यातील वातानुकूलित आॅटो पाहिला. आपणही तसाच ...
ठळक मुद्देकर्नाटकातून घेतली प्रेरणा