शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

मद्यपींनी सहा महिन्यांत रिचवली 94 लाख लिटर दारू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2021 5:00 AM

सन २०१५ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी करण्यात आली. त्यानंतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची अवैध विक्री फोफावली होती. दरम्यान महाविकास आघाडी सरकारने दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेतला. दरम्यान जिल्ह्यातील मद्यप्रेमी दारू बंदी हटण्याची चातकाप्रमाणे वाट बघू लागले होते. ५ जुलैपासून परवानाप्राप्त दारू दुकानांतून मद्यविक्री सुरू होताच मद्यप्रेमी दारूवर तुटून पडले होते. 

परिमल डाेहणेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील सहा वर्षांपासून बंद असलेली दारू सुरू होताच जिल्ह्यातील मद्यप्रेमींना आनंदाची पर्वणीच ठरली आहे. मागील सहा महिन्यांत जिल्ह्यातील मद्यप्रेमींनी चक्क ९४ लाख ३४ हजार ५४२ लिटर दारू रिचवली आहे. यामध्ये ६१ लाख ७५ हजार ५११ लिटर देशी, १६ लाख ५८ हजार ५४२ लिटर विदेशी तर १५ लाख ६३ हजार ४० लिटर बिअर, ३७ हजार ४४९ लिटर वाइन रिचवली असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येते. या आकडेवारीने चंद्रपूर जिल्हावासीयांनी मद्य पिण्यासाठी बरीच आघाडी घेतली असल्याचे दिसून येते.सन २०१५ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी करण्यात आली. त्यानंतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची अवैध विक्री फोफावली होती. दरम्यान महाविकास आघाडी सरकारने दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेतला. दरम्यान जिल्ह्यातील मद्यप्रेमी दारू बंदी हटण्याची चातकाप्रमाणे वाट बघू लागले होते. ५ जुलैपासून परवानाप्राप्त दारू दुकानांतून मद्यविक्री सुरू होताच मद्यप्रेमी दारूवर तुटून पडले होते. जुलै महिनाभर तर जिल्ह्यातील बहुतांश दारूविक्रीच्या दुकानासमोर रांगाच्या रांगाच लागलेल्या दिसून आल्या. काही ठिकाणी तर पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. अवघ्या सहा महिन्यांतच जिल्हावासीयांनी ९४ लाख ३४ हजार ५४२ लिटर दारू रिचवली आहे. यामुळे शासनाला लाखो रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. मात्र ही आकडेवारी मद्यपींबाबत चिंता व्यक्त करणारी आहे.

ग्रामीण भागात दारूची अवैध विक्री सुरूच- शासनाने दारूवरील बंदी हटवली असली तरी ग्रामीण भागात अद्यापही दारूची अवैध विक्री सुरूच आहे. ज्या गावामध्ये दारू भट्टी किंवा बार नाही, अशा गावांत अनेकजण दारूची अवैध विक्री करीत असताना दिसून येत आहेत. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. 

देशी दारूवर अधिक प्रेमजिल्ह्यात देशी दारूपेक्षा विदेशी दारूचे दुकान अधिक आहेत. मात्र तरीसुद्धा मद्यप्रेमींकडून देशी दारूची मागणी अधिक असल्याचे दिसून येते. मागील सहा महिन्यांत ६१ लाख ७५ हजार ५११ लिटर देशी दारूची विक्री झाली आहे. यावरून मद्यप्रेमींचे देशी दारूवर अधिक प्रेम असल्याचे दिसून येते. त्याखालोखाल विदेशी दारुची विक्री झाली आहे.

दारू पिण्यासाठी लागणार  परवाना- देशी असो की विदेशी कोणतीही दारू खरेदी करायची असेल तर ग्राहकाला परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. मद्यपींना आजीवन, वार्षिक किंवा दररोजचा परवाना काढता येणार आहे. - दररोजचा परवाना हा मद्य दुकानामध्ये मिळणार आहे. देशीसाठी दोन, तर विदेशीसाठी पाच रुपयांचा परवाना लागणार आहे. तर आजीवन परवाना एक हजार रुपये, तर वार्षिक परवाना शंभर रुपये शुल्क लागणार आहे. 

 

टॅग्स :liquor banदारूबंदी