शेतकरी संपाची धग : सोमवारी पंधराही तालुक्यात आंदोलनलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र किसान क्रांतीने (नाशिक) घोषित केल्याप्रमाणे १२ जून २०१७ ला सकाळी १० ते ५ पर्यंत तहसील कार्यालयासमोर सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.चंद्रपूर जिल्ह्यातही सगळ्या राजकीय, सामाजिक व शेतकऱ्यांच्या संघटनेमार्फत हे विशाल धरणे आंदोलन जिल्ह्यातील पंधराही तालुक्यात होणार असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व शेतकरी समर्थक जनतेनी मोठ्या संख्येत उपस्थित राहून शेती निगडीत मागण्याबाबत लढा द्यावा व महाराष्ट्र शासनाच्या शेतकरीविरोधी भूमिकेचा निषेध करावा. राज्य व केंद्र सरकारने शेतकऱ्याचा तोंडाला पाने पुसली म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदाच शेतकरी संपावर गेला असून शेतकऱ्यांचा एकतेत काय ताकद आहे, हे शेतकऱ्यांनी महाराष्ट्राला व देशाला दाखवून दिले आहे. आजची शेती शेतकऱ्यांना परवडणारी नाही,यावर उपाययोजना म्हणून कर्जमाफी करावी, शेतमालाला भाव द्यावा, सरकारने भाजपाच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात देशातील जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण करावे, अशी मागणी याआंदोलनात करण्यात येणार आहे. या आंदोलनात सहभागी हेण्याचे आवाहन नरेश पुगलिया, आ. विजय वडेट्टीवार, आ. बाळू धानोरकर, माजी आ.सुभाष धोटे, किशोर पोतनवार, पप्पू देशमुख, आदींनी केले आहे.ब्रह्मपुरीत कडकडीत बंदब्रह्मपुरी : संपूर्ण कर्जमुक्ती व हमीभावासाठी आज शनिवारी बंद पुकारण्यात आला होता. तो शंभर टक्के यशस्वी झाला असून सकाळपासून व्यापारी व अन्य प्रतिष्ठाने शनिवारी दिवसभर बंद होती.किसान क्रांती मोर्चा समन्वय समितीद्वारा विविध पक्षांच्या व संघटनांच्या वतीने शनिवारी आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवून पाठिंबा दर्शविला आहे. दुपारी ११.३० वाजता हुतात्मा स्मारकामधून विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर हा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला. तिथे अधिकाऱ्यांना शिष्टमंडळाच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले. मोर्चात तालुक्यातील व शहरातील बहुसंख्य शेतकरी सहभागी झाले होते.
शेतकऱ्यांसाठी सर्वपक्षीय आंदोलन
By admin | Published: June 11, 2017 12:27 AM