शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
3
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
4
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
5
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
6
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
7
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
8
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
9
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
10
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
11
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
12
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
13
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
14
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
15
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
16
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
17
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
18
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
19
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
20
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...

जिल्ह्यातील सर्व प्रकल्प हाऊसफुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2019 12:33 AM

यावर्षी जिल्ह्यात नव्हे तर विदर्भातच पावसाचे आगमन उशिरा झाले. पाऊस येणार का नाही, याची शेतकºयांना व सर्वसामान्य नागरिकांना चिंता लागून होती. मात्र जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने आपला कोटा पूर्ण केला. मागील वर्षीचा हंगाम शेतकऱ्यांसाठी अभिशाप ठरला. मोठ्या उत्साहाने पैशाची जुळवाजुळव करुन शेतकरी गतवर्षी खरीपासाठी उभा झाला. मात्र वरूणराजाने त्याचे कंबरडेच मोडले. परिणामी शेतकऱ्यांना पिके वाचविताना मोठी कसरत करावी लागली होती. कशीबशी शेतकऱ्यांनी आपली पिके वाचविली.

ठळक मुद्दे४७ मामा तलावही ओव्हरफ्लो : सिंचनासाठी शेतकऱ्यांना मोठा आधार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ऑगस्ट महिन्यात पडलेल्या संततधार पावसामुळे जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील अकरापैकी अकराही सिंचन प्रकल्प शंभर टक्के भरले आहे. तर नदी, नाले, शेतकऱ्यांचे सुरक्षित सिंचन म्हणजे तलावदेखील तुडूंब भरले आहेत. जिल्ह्यातील ५१ पैकी ४७ मामा तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत. ३७ लघू प्रकल्पापैकी ३१ प्रकल्पही शंभर टक्के भरले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना पुढे सिंचनासाठी मोठी मदत होणार आहे.यावर्षी जिल्ह्यात नव्हे तर विदर्भातच पावसाचे आगमन उशिरा झाले. पाऊस येणार का नाही, याची शेतकºयांना व सर्वसामान्य नागरिकांना चिंता लागून होती. मात्र जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने आपला कोटा पूर्ण केला. मागील वर्षीचा हंगाम शेतकऱ्यांसाठी अभिशाप ठरला. मोठ्या उत्साहाने पैशाची जुळवाजुळव करुन शेतकरी गतवर्षी खरीपासाठी उभा झाला. मात्र वरूणराजाने त्याचे कंबरडेच मोडले. परिणामी शेतकऱ्यांना पिके वाचविताना मोठी कसरत करावी लागली होती. कशीबशी शेतकऱ्यांनी आपली पिके वाचविली. मात्र उत्पादनावर मोठा परिणाम झाला. पाहिजे तसे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती आले नाही.त्यामुळे शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत लोटला गेला. लावलेला पैसाही निघाला नाही. त्यामुळे डोक्यावरील कर्ज तो फेडू शकला नाही. रबी हंगामानेही शेतकऱ्यांना पाहिजे तसा फायदा करवून दिला नाही. तरीही यंदा शेतकरी पुन्हा खरिपाच्या तयारीला लागला. मात्र समुद्रात उठलेल्या चक्रीवादळामुळे मान्सून योग्य वेळी आला नाही. शेतकऱ्यांनी पेरणी थांबविली. गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे मामा तलावातही पाणी नव्हते. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होता.अशातच जुलैच्या अखेरच्या तीन दिवसांपासून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संततधार पाऊस पडला. त्यानंतर ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवाड्यातही चांगला पाऊस पडला. या पावसामुळे वर्धा, पैनगंगा, उमा, शिरणा, इरई यासारख्या नद्या व मोठे नाले तुडुंब भरले आहेत. दमदार पावसामुळे जिल्ह्यातील चंदई, चारगाव, लभानसराड, डोंगरगाव, इरई, आसोलामेंढा, घोडाझरी, नलेश्वर, अमलनाला, पकडीगुड्डम, लालनाला या अकराही सिंचन प्रकल्पात सद्यस्थितीत शंभर टक्के जलसाठा आहे.इतर प्रकल्पातही शंभर टक्के जलसाठाचंद्रपूर जिल्ह्यात ३७ लघू प्रकल्प आहेत. यातील ३१ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. याशिवाय ४७ मामा तलावही शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो होत आहे. म्हणजेच जिल्ह्यात ९८ प्रकल्पापैकी ८८ प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत.

टॅग्स :agricultureशेती