लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही वर्षांमध्ये तंबाखू खाणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे शासनस्तरावर यावर आळा घालण्यासाठी प्रयत्न सुरु असले, तरी आजही पाहिजे तशी जनजागृती झाली आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागामध्ये काही बालकसुद्धा तंबाखूच्या आहारी गेले आहे. त्यामुळे शाळांच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी आता बालकदिनानिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये तंबाखुमुक्तीची शपथ देण्यात येणार आहे.भारतात दरवर्षी तंबाखुमुळे १३.५ लाख लोकांचा मृत्यू होतो. महाराष्ट्रात हे प्रमाण ७२ हजार एवढे आहे. तर राज्यात दररोज ५२९ मुले तंबाखूच्या वापरास प्रारंभ करत असल्याचे एका अहवालामधून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे तंबाखूच्या विळख्यातून प्रत्येकांना काढणे गरजेचे आहे. याचाच एक भाग म्हणून गांधी जयंतीनिमित्ताने राज्यातील सर्व शाळा, कॉलेजमध्ये तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती सुरू करण्यात आली. त्यानंतर आता बालकदिनी राज्यातील सर्व शाळांमध्ये तंबाखूमुक्तीची शपथ विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.
बालकदिनी सर्व शाळांना घ्यावी लागणार तंबाखुमुक्तीची शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:59 PM