एका विवाहाचा मुहूर्त : ह्युमन वेलफेअर मल्टीपर्पजचा उपक्रमभद्रावती : येथील ह्युमन वेलफेअर मल्टीपर्पज असोशिएशनने भद्रावती येथे सर्व धर्मातील विधवा महिला व विधूर पुरुषांचा परिचय मेळावा आयोजित केला. त्याला सर्व धर्मातील गरजूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर येथील अॅड. फरहत बेग होते. मंचावर प्रमुख अतिथी आ. बाळू धानोरकर, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, चंद्रपूर महिला काँग्रेस कमेटीच्या जिल्हाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, सामाजिक कार्यकर्ते विशाल बोरकर आदी उपस्थित होते. या मेळाव्यामध्ये शेकडो विधुर-विधवांनी परिचय दिला तर रामदास शंकर तंतरपाळे व अण्णपूर्णा बालकर यांचा विवाहसुद्धा पार पडला. यावेळी आ. बाळू धानोरकर म्हणाले की, ह्युमन वेलफेअर मल्टीपर्पज असोशिएशनने भद्रावती सारख्या लहान गावात सर्व धर्मातील विधूर असलेल्या महिला व पुरुषांचा परिचय मेळावा आयोजित करून चांगला उपक्रम राबविला. अशा कार्यक्रमाच्या कोणत्याही आयोजनाला कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास ती आपण पुरवू, अशी ग्वाही त्यांनी दिली.महिला काँग्रेस कमेटीच्या जिल्हाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे म्हणाल्या की समाजातील विधूर असलेल्या महिला-पुरुषांचे समाजात समायोजन करणे ही एक पुण्याची बाब आह‘, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, अॅड. फरहतबेग व सामाजिक कार्यकर्ते विशाल बोरकर, अॅड. किशोर पुसलवार, मोहमंद जिलानी यांनीही आपआपले विचार मांडलेत. हा उपक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दल उषा मून, सुधा पाचघरे, अनिता वनकर, किरण सूर्यवंशी, अमोल भगत, करुणा मेश्राम, वनमाला टिकले व सहकार्य केल्याबद्दल विशाल बोरकर यांचा सत्कार करण्यात आला. संचालन सलमान मौशिम खान व उपस्थितांचे आभार मतीन शेख यांनी मानलेत.या मेळाव्याच्या यशस्वीतेकरिता अल्का वाटेकर, इतिका शहा व मनिषा बोरकर यांनी अथक परिश्रम घेतलेत.(तालुका प्रतिनिधी)
सर्वधर्मीय विधूर महिला-पुरूष परिचय मेळावा
By admin | Published: February 06, 2017 12:42 AM