फारुख म्हणाले की, वक्फ बोर्डाच्या जमिनीवर भाडेकरू असून, नियमित भाडे भरत आहे. कोणत्याही प्रकारे अतिक्रमण केलेले नाही. राजुरा शहर चुनाभट्टी प्रभागातील खादिम कब्रिस्तान हाश्मी कादरी कब्रिस्तान जुना सर्व्हे क्र. १५३ आराजी ३५० बाय २५० या जागेची बाब मराठवाडा वक्फ बोर्ड औरंगाबाद, महाराष्ट्र राज्य आणि सौभावरी दीपक देशपांडे आणि इतर यांच्यासह न्यायालयात सुरू आहे. चुनाभट्टी वॉर्डात असलेल्या वक्फ बोर्डाच्या जमिनीवर गेल्या ३० वर्षांपासून भंगार व्यवसाय करीत आहे. ही जमीन मराठवाडा वक्फ बोर्डाच्या औरंगाबाद महाराष्ट्र राज्याची जमीन असून, ते भाड्याने देत असल्याचेही फारूख यांचे म्हणणे आहे. १९८६ मध्ये जेव्हा तत्कालीन नगरपालिका प्रशासनाने या जागेवर जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मुस्लीम समाजाच्या विरोधानंतर पालिकेने आपला विचार बदलला. यानंतर २०१८ मध्ये मराठवाडा वक्फ बोर्ड औरंगाबाद येथील १२ मीटर रस्त्याच्या प्रस्तावावर महाराष्ट्र शासनाच्या मालकीची जमीन असल्याचा पुरावा पुरविल्याबद्दल मुस्लीम समाजाने विरोध दर्शविल्यानंतर नगर परिषदेने हा प्रस्ताव तहकूब केला, याकडेही फारुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून लक्ष वेधले आहे.
वक्फ बोर्डाच्या जमिनीवरील अतिक्रमणाचे आरोप फेटाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2021 4:22 AM