शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

अपंग मनोजची जगण्यासाठी केवलवाणी धडपड

By admin | Published: May 01, 2016 12:37 AM

दोन्ही पायांनी विकलांग असलेल्या मनोजने चार-पाच वर्षांपूर्वी अवैध दारूविक्री करीत आपल्या संसाराचा गाडा हाकत होता.

प्रशासनाकडून आश्वासनाची खैरात : अवैध धंद्यातून बाहेर पडलेल्या युवकाची व्यथाशशिकांत गणवीर भेजगावदोन्ही पायांनी विकलांग असलेल्या मनोजने चार-पाच वर्षांपूर्वी अवैध दारूविक्री करीत आपल्या संसाराचा गाडा हाकत होता. अशातच जिल्हा दारूबंदीची मागणी रेटणाऱ्या श्रमिक एल्गार संघटनेशी मनोजचे संंबध आले. या संस्थेच्या कार्याने मनोजने प्रभावित होऊन दारूबंदीच्या कार्यात स्वत:ला झोकुन दिले. आपण अपंग असतानाही दारूचा धंदा बंद करून समाजासमोर नवा आदर्श दिला. दारूमुळे सामाजिक वातावरण बिघडत होते. कुटुंबा कुटुंबांमध्ये कलह निर्माण होऊन भांडण होत होते. आपण या व्यतिरिक्तही काही नविन करता येते या धाडसाने दारू व्यवसाय बंद केला.यानंतर मनोजने नव्या आशेने सन २००९ मध्ये श्रमिक सुशिक्षित बेरोजगार सेवा संस्था या संस्थेच्या माध्यमातून काही काम मिळेल, या आशेने सहा-सात वर्षांपासून प्रशासनाचे उंबरठे झिजविले. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. मनोज रामदास पिपरे (३१) असे नाव असलेला हा युवक भेजगाव येथून जवळच असलेल्या येसगाव येथे रहिवासी आहे. त्याच्या घरी अठराविश्व दोरिद्रय असल्याने घरची परिस्थिती हलाखीची आहे. परिणामी बालपणी झालेल्या पोलिओवर वेळेवर उपचार होऊ शकले नाहीत. त्यामुळे मनोजला आपले दोन्ही पाय गमवावे लागले. अगदी खेळण्या बागडण्याच्या वयातच मनोजला विकलांग व्हावे लागले.संस्था नोंदणीच्या तीन वर्षानंतर बेरोजगारांना मानधन मिळेल, अशी आशा एका अधिकाऱ्याने दाखविली. मात्र या आशेवर राहणाऱ्या मनोजला ना मानधन ना काम मिळाले.आज ना उद्या काम मिळेल या आशेने संस्थेच्या लेखा परिक्षणासह कागदपत्रे निट सांभाळतो आहे. जगण्यासाठी आटापिटा करतानाच मनोजने नात्यातीलच एका मुलीशी विवाह केला. एक मुलगा असल्याने पुन्हा कुटुंबांची जबाबदारी वाढली. परिणामत: मनोज हलाखीचे जीवन जगत आहे.मूल येथील एका प्रतिष्ठित धनदांडग्या राजकीय पुढाऱ्याने अपंग मनोजचे नाव आघाडीच्या काळात मंत्र्यांसमोर पुढे करून मनोजची व्यथा मांडली. मंत्री महोदयांनाही पाझर फुटला. अपंग मनोजची अवस्था अन् तळमळ पाहुन मंत्री महोदयांनी आठ दिवसांत संस्थेला मिटर रिडींगचे काम मिळवून दिले. मात्र मनोजच्या संस्थेला मिळालेले काम या राजकीय पुढाऱ्याने आपल्याच पदरात पाडून घेतले व मनोजच्या संस्थेच्या नावावर जवळपास दहा लाख रुपये बिलाची उचल केली. मात्र या कामाचा एक रुपयाही मनोजला मिळाला नाही.अपंग मनोजची या पुढाऱ्यांनी विश्वासघात करीत फसवणूक केली याचे शल्य अजुनही मनोजला बोचत आहे.अपंगांना अंत्योदयमध्ये सामावून घेवून त्यांना अन्नधान्य व घरकुलाचा लाभ प्रशासनाने द्यावा, अशी मागणी मनोजची आहे.सात-आठ महिन्यांपूर्वी सेतू केंद्रातील आॅपरेटर भरण्याच्या संदर्भाने संस्थेला पत्र आले असता मनोजने तालुकास्तरावर तहसील कार्यालयात आॅपरेटर देण्यासाठी प्रयत्न केले. संस्थेची निवडही झाली. संस्थेने आॅपरेटरची माहितीही दिली. मात्र प्रशासनाच्या लाचखोर व हलगर्जी धोरणाने मनोजच्या संस्थेला काम मिळाले नाही. पर्यायाने मनोजने जिल्हाधिकारी म्हैसेकर यांची भेट घेऊन त्यांच्या पुढे आपली व्यथा मांडली. जिल्हाधिकाऱ्यांनी चार दिवसांत काम देण्याचे आश्वासन दिले. मात्र जिल्हाधिकाऱ्यांचेही आश्वासन हवेत विरले.