शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

जलाशयातील गाळ उपसण्याची परवानगी द्या

By admin | Published: May 29, 2016 1:03 AM

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरपना तालुक्यातील अमलनाला व पकडीगुड्डम हे दोन प्रकल्प नाबार्ड व राज्यशासनाच्या निधीतून...

आबीद अली यांची मागणी : तर प्रकल्पाची क्षमता वाढून शेतकऱ्यांना लाभगडचांदूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरपना तालुक्यातील अमलनाला व पकडीगुड्डम हे दोन प्रकल्प नाबार्ड व राज्यशासनाच्या निधीतून शेतीच्या उत्पादनात वाढ व्हावी म्हणून १९८५ ते १९९५ च्या दशकात आदिवासी गावाच्या डोंगर पायथ्याशी कार्यान्वित झाले. अमलनाला २९३१ हेक्टर व पकड्डीगुडम २९६८ हेक्टर क्षेत्र सिंचनाच्या लाभ क्षेत्रात प्रस्तावित आहे. यामध्ये लाभ क्षेत्रातील २५ ते ३० गावे समाविष्ट असून जलसाठा क्षमता अमलनाला २४.२६ द.ल.घ.मी तर पकड्डीगुडम ११.०७ द.ल.घ.मी आहे. मात्र प्रस्तावित क्षेत्रात समाविष्ट केलेल्या गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोहोचविण्यात पाटबंधारे विभाग अपयशी ठरले असून विभागाला तब्बल ३० वर्षात उद्दिष्ट साध्य करता आलेले नाही. आता या जलाशयातील गाळ उपसण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे नेते सय्यद आबीद अली यांनी केली आहे.प्रस्तावित लाभ क्षेत्रातील खिरडी, वडगाव, पिंपळगाव, लखमापरू, भेडवी, थुटरा, धामगणाव, वनसडी, देवघाट, सोनुर्ली, पिपर्डा या गावात अनेक शेतकरी कोरडवाहूच शेती निसर्गाच्या भरवशावर करीत आहे. तब्बल ३० वर्षे लोटूनसुद्धा ओहोटी नाल्याने पाणी वाया जात आहे. अनेक पाटचारी व लघुवितरिका अपूर्ण अवस्थेत आहे. पाणी बांद्यावर जाण्याऐवजी नाल्याच्या प्रवाहाने वाहून व्यर्थ जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन व हरित क्रांतीचे स्वप्न हवेत विरघळले. मात्र पाटबंधारे विभागाकडून कचरा साफ करण्याव्यतिरिक्त दुरुस्ती हाती घेऊन सिंचने वाढविण्याचा प्रयत्न झाला नाही. उलट या प्रकल्पाचे पाणी अंबुजा, अल्ट्राटेक, माणिकगड सिमेंट उद्योगांना देण्याचा निर्णय शासनाने घेतला. यामुळे प्रस्तावित क्षेत्रात २३०० हेक्टर क्षेत्र सिंचनापासून वंचित झाले. त्याबरोबर याच प्रकल्पामधून १४ गावाच्या ग्रामीण पाणी पुरवठा नळयोजनेला पाणी पुरवठा केला जातो. अमलनाला धरणामध्ये जलक्षेत्र २४.२६ द.श.घ.मी होते. मात्र त्या ठिकाणी गाळसाठा झाल्याने २.०८ द.श.घ.मी. पाणीसाठा कमी झाला. उलट या ठिकाणी सांंडण्याची उंची व मीटर वाढवूनसुद्धा २.८० द.श.घ.मी म्हणजेच उपयुक्त साठा २७.०६ अपेक्षित होता. तो साध्य झाला नाही, आदिवासी भागातील दोन्ही प्रकल्प शेतकऱ्यांच्या ऐवजी सिमेंट कंपन्यांना वरदान ठरले असून लाभ क्षेत्रातील अनेक गावे भीषण पाणी टंचाईचा सामना करीत आहे. लखमापूरसारख्या गावी टँकरने पाणी पुरवठ्याची वेळ आलेली आहेत.सदर भागात उद्योग आले. मात्र उत्तरेला पैनगंगा वाहते १०० कि.मी. क्षेत्रात आदिलाबादपासून सुबई या गावापर्यंत कुठेही उच्च पातळीचा बांध नदीवर नाही. १० वर्षांपूर्वी शिवणी बॅरेजचे सर्वेक्षण झाले. त्यापुढे हे काम सरकलेच नाही. दोन्ही प्रकल्पामध्ये जंगली भागातील पालापाचोळा व गाळ साठलेला आहे. शेतीच्या जमिनीत त्याचा वापर केल्यास जमिनीची सुपीकता वाढून उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. धरणातील जलसाठा वाढण्याससुद्धा मदत होईल. शासनाने धरणातून गाळ उपसण्याची शेतकऱ्यांना परवानगी द्यावी, अशी मागणी आबीद अली यांनी ना. गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. (वार्ताहर)