चंद्रपूर : मागील काही दिवसांत महागाई सातत्याने वाढत आहे. यातून फोडणीचे तेलही सुटले नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांना फोडणीसोबत देवापुढे दिवाही ठेवणे कठीण होऊन बसले आहे. कोरोना संकटामुळे सामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडला आहे. सातत्याने वाढणाऱ्या महागाईमुळे जीवन जगणे कठीण होऊन बसले आहे. अनेकांच्या हातचा रोजगारही गेला आहे. अशा कठीण प्रसंगी महागाई दररोज उच्चांक गाठत आहे. रोजच्या गरजेचे असलेले फोडणीचे तेलही वर्षभरात ३० ते ५० रुपयांपर्यंत महाग झाले आहे, तर मागील काही दिवसांत तेलाच्या किमती १० रुपयांनी पुन्हा वाढल्या आहेत. त्यामुळे फोडणीसह देवापुढील दिवाही महागला आहे.
बाॅक्स
तेलाचे दर (प्रति किलो)
जुलै, २०२० जुलै, २०२१
सोयाबीन - १२० १५०
पाम ७५ १००
सूर्यफूल
फल्ली तेल
बाॅक्स
कारण काय
मागील काही दिवसांपासून इंधनाचे दर झपाट्याने वाढले आहे. त्यामुळे वाहतूक खर्च अतिरिक्त करावा लागत आहे. त्यातच सोयाबीन, तसेच तेल उत्पन्न मिळणारे इतर शेतमालांचे उत्पादन काही अंशी कमी झाल्यामुळे सध्या तेलाचे भाव गगनाला भिडले आहे. विशेषत: सध्या सणावारांचे दिवस आहे. या दिवसांमुळे बहुतांश तेल उत्पादक कंपन्या नफ्यासाठी तेलाचे भाव वाढवितात. परिणामी, सामान्य, तसेच गरीब नागरिकांच्या खिशाला आर्थिक ताण पडत आहे.
बाॅक्स
पोटपूजेसोबतच देवपूजाही महागली
कोरोना संकटामुळे सामान्य नागरिक मेटाकुटीस आला आहे. त्यातच वाढत्या महागाईमुळे जगणे कठीण होऊन बसले आहे. इंधन दरवाढ झाल्यामुळे प्रत्येक गोष्टी महागल्या आहेत. तेलाचे दरही वाढले आहे. त्यामुळे महागाई कमी करून दिलासा देणे गरजेचे आहे.
- शांताबाई महाजन, चंद्रपूर
कोट
तेलाचे भाव सातत्याने वाढत आहे. ८० ते ९० रुपये लीटर असलेले तेल आता १४० ते १५० रुपयांवर गेले आहे. सरकार गोरगरिबांचा विचारच करीत नाही. निवडणूक आल्या की, केवळ आश्वासन देऊन मोकळे होतात. आता महागाई वाढली असतानाही कोणीच बोलायला तयार नाही.
- लता मैंदळकर, चंद्रपूर