लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: मराठा आरक्षणाच्या संदर्भात केंद्र सरकारने भूमिका घ्यावी अशी मागणी करण्याकरिता आज मंगळवारी होत असलेली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट ही महाराष्ट्राच्या अनेक प्रश्नांकरिता आशादायी ठरेल असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी येथे व्यक्त केला.यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटी घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याची जी प्रथा होती ती नरेंद्र मोदी यांच्या काळात खंडित झाली आहे. ती या निमित्ताने सुरु व्हावी. मराठा आरक्षणासोबत राज्याच्या विकासाचे अनेक प्रश्न निधीअभावी प्रलंबित आहेत. त्या निधीबाबतही मुख्यमंत्री पंतप्रधानांसोबत चर्चा करतील अशी अपेक्षा आहे.