शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
3
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
4
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
6
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
7
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
8
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
9
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
10
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
11
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
12
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
13
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
14
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
15
मलिकांवरील गुन्ह्याच्या तपासाची माहिती द्या; उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश
16
मनसेच्या पराभूत उमेदवारांना राज ठाकरेंनी दिली उमेद; अडचणी समजावून घेत साधला संवाद
17
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
18
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
19
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...

पोषण आहारासोबतच शिक्षकांंनी विद्यार्जनही करावे

By admin | Published: April 12, 2015 12:51 AM

उन्हाळ्याच्या सुट्यांतही शालेय पोषण आहार सुरू ठेवण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. ..

पालकांची अपेक्षा : दुष्काळग्रस्त जिल्ह्यांसाठी विशेष योजनानागभीड : उन्हाळ्याच्या सुट्यांतही शालेय पोषण आहार सुरू ठेवण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. उन्हाळ्याच्या सुट्यांत ही योजना कितपत यशस्वी होईल, अशी शंका यानिमित्ताने व्यक्त होत असली तरी योजनेबाबत सकारात्मक दृष्टीकोण ठेवून शालेय पोषण आहारासोबत याच वेळात विद्यार्जनही करावे अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त होत आहे.ज्या जिल्ह्याची परिस्थिती दुष्काळसदृश आहे, अश्या सर्व जिल्ह्यात शासनाने शालेय पोषण आहार उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षकांच्या दृष्टीने अश्या दिवसांत ही योजना कटकटीची असली तरी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने निश्चितच फायद्याची आहे. तसेही उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये विद्यार्थी इकडे तिकडे भटकत असतात. अश्यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना या योजनेविषयी योग्य मार्गदर्शन केल्यास निश्चितच ते शाळेत येतील आणि शाळेविषयी त्यांना ओढ कायम राहील.कदाचित १०० टक्के प्रतिसाद या योजनेला या दिवसात मिळणार नाही, हे जरी खरे असले तरी जे विद्यार्थी या निमित्ताने शाळेत येतील, त्या विद्यार्थ्यांना किमान एक ते दीड तास शिक्षकांकडून पुढच्या वर्षाच्या अभ्यासक्रमाविषयी माहिती देण्यात आली, तर त्याचा फायदा विद्यार्थ्यांनाच होणार आहे. आणि अनेक शालोपयोगी उपक्रमही घेण्यात आले तर त्या शाळेचे निश्चितच नाव होणार आहे.तसेही गेल्या काही वर्षात शाळांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने विद्यार्थी मिळविण्यासाठी शिक्षकांसमोर मोठा गहण प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे १५-२० वर्षाअगोदर शिक्षकांना उन्हाळ्याच्या सुट्टयांचा जो आनंद उपभोगता यायचा तो आनंद विद्यार्थी मिळविण्याच्या या नव्या उद्योगाने केव्हाचाच हिरावून घेतला आहे. विद्यार्थी मिळविण्याच्या या उद्योगांवर चर्चा करण्यासाठी शिक्षकांना उन्हाळ्याच्याही सुट्टयात शाळेत यावेच लागते. त्यामुळेच उन्हाळ्यातील शालेय पोषण आहाराने उन्हाळ्याच्या सुट्टयांचा आनंद हिरावला, असे म्हणणे उचित नाही. (तालुका प्रतिनिधी)या निमित्ताने विद्यार्थ्यांचे शारिरीक पोषण तर होईलच. पण त्याच बरोबर विद्यार्थ्यांना वर्षभर शिक्षकांचा सहवास लाभेल. शिक्षकांनी मनावर घेतले तर ते पुढच्या वर्षाची उत्तम तयारी करू शकतात. त्यांचा फायदा विद्यार्थ्यांनाच होईल.- गोकुल पानसेमुख्याध्यापक, सरस्वती ज्ञान मंदिर, नागभीड