अल्का आत्राम: डोंगरहळदी शाळेत वृक्षारोपण
चंद्रपूर : एक विद्यार्थी, एक झाड' हा उपक्रम शाळेत राबवून ते झाड जगले पाहिजे यासाठी प्रयत्न करा, झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात, झाडांमुळे पर्यावरणाचे संतुलन स्थिर राहते, जमिनीची धूप होत नाही, आपल्याला औषधी, पाणी, अन्नदेखील झाडांमुळेच मिळत असल्याने प्रत्येकांनी वृक्षारोपण आणि त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे, असे मत पोंभूर्णा पंचायत समितीच्या सभापती अल्का आत्राम यांनी व्यक्त केले.
पोंभूर्णा पंचायत समिती अंतर्गत जि.प. प्राथ. शाळा डोंगरहळदी तुकूम येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संवर्ग विकास अधिकारी सुनीता मरस्कोले, गटशिक्षणाधिकारी दिलीप सोनपुरे, केंद्रप्रमुख प्रकाश कुंभरे, सरपंच संगीता कुळमेथे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास बुरांडे,ग्रा.पं. सदस्य निशा गद्देकर, मुख्याध्यापक तथा शिक्षण समितीचे निमंत्रित सदस्य जे. डी. पोटे, कृषी सहाय्यक विशाल भेंडेकर, निरुता बुरांडे, मोहिणी सोमणकर, पुष्पा बुरांडे,रूपाली गेडाम आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. प्रास्ताविक जे.डी. यांनी केले. यावेळी शाळेत अशोक, कडुनिंब, शेवगा आदींचे वृक्षारोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आयोजनाकरिता अनिल बुरांडे, रंजित जुवारे,मनोज कुळमेथे, देवीदास मडावी, प्रवीण सोमनकर, बालाजी गडकर उषा वासेकर, भावना बुरांडे आदींनी सहकार्य केले.