शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
2
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
3
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
4
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
5
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
6
हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  
7
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
8
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
9
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
10
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
11
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
12
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
13
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
14
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
15
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
16
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
17
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
18
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
19
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
20
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ

झोपताना ‘त्याच्या’ उशाला नेहमीच वाळवीचे डुंबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 5:00 AM

  निलेश झाडे / राजेश माडूरवार     लोकमत न्यूज नेटवर्क गोंडपिपरी : आयुष्याचा शेवटचा टप्यावर तो उभा आहे. मात्र ...

ठळक मुद्देघरकुलाच्या प्रतीक्षेत आयुष्य चालले

  निलेश झाडे / राजेश माडूरवार    लोकमत न्यूज नेटवर्कगोंडपिपरी : आयुष्याचा शेवटचा टप्यावर तो उभा आहे. मात्र घरकुलाची प्रतीक्षा संपलेली नाही. मातीच घर असल्याने घरात वारूळ निर्माण झाले. साप-विंचवाची कायमची  भीती. तरीही वारूळाला उशाशी घेऊन तो जगतो आहे. अंगावर शहारे आणणारी ही स्थिती आहे, वढोली येथील बंडू राऊत या वृध्दाची. लोकप्रतिनिधी आणि निगरगट्ट प्रशासनाला राऊत यांचे दुःख अद्यापही दिसले नाही. योजनांना पात्र होण्यासाठी लाभार्थ्याची स्थिती गरजेची नाही, तर कागदपत्र पुर्ण असणं गरजेचे झाले आहे. त्यामुळे असे वृध्द जगले काय किवा मेले काय, याच्याशी व्यवस्थेला आणि शासनाला काहीही देणंघेणं उरलेलं नाही, हेच सिध्द होते.चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या वढोली येथील लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यास प्रशासकीय यंत्रणा टाळाटाळ करीत आहे. छटाकभर कागदाच्या त्रुटीसाठी दिडशे प्रस्ताव अडकवून पडले आहेत. असेच एक लाभार्थी आहेत बंडू राऊत. त्यांची परिस्थिती अंगावर शहारे आणणारी आहे. घरासाठी अनेक वर्षांपासून पत्रव्यवहार करून काहीएक फायदा त्यांना झालेला नाही. त्यांची झोपडी आता जीर्ण झालेली आहे. केव्हा कोसळेल याचा नेम नाही. मातीचं घर असल्यानं घरातच वारूळ निर्माण झालं. त्यामुळं साप-विंचवांची सतत भीती. पण तरीही जीवन आहे तोपर्यंत इथंच राहायचं आणि याच जागेवर घरकुल बांधून कुटुंबाला आधार द्यायचा, ही त्यांची अंतिम इच्छा. घरात साप-विंचवांची भीती असल्यानं त्यांनी आपल्या मुलाला दुसऱ्या गावात पाठवलं. आणि स्वतः काबाडकष्ट करून ते अक्षरशः मृत्यूसोबत जगत आहेत. ऊन-वारा-पाऊसधारा याचा सामना करण्यास असमर्थ असलेल्या घराच्या बदल्यात नवं घरकुल मिळावं, यासाठी ते ग्रामपंचायतच्या पायऱ्या झिजवत आहेत. असे अनेक गावकरी आज घरकुलाच्या प्रतीक्षेत आहेत. सरकार योजना आणते, पण त्याची अंमलबजावणी कशी केली जाते, याचा हा उत्तम नमुना. अधिका-यांच्या उदासीनतेमुळं आज या वृद्धाला कुटुंबाचा आधार मिळू शकत नाही.  घरकुलाच्या या गंभीर समस्येला घेऊन गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी कृती समिती स्थापन केली. तब्बल ७ किलोमीटरचा पायी प्रवास करीत तहसीलवर मोर्चा काढला. मात्र असंवेदनशील लोकप्रतीनिधी आणि निगरगट्ट प्रशासनाला जाग आली नाही .बंडू राऊत प्रमाणेच वढोली गावातील दिडसे कुटूंब घरकुलाची प्रतीक्षेत आहेत. 

या आहेत त्रुटी वढोली येथे घरकूल लाभार्थांची जाहीर झालेली यादी ‘ड’  यादी आहे. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात घरकूल मंजूर होत असलेली यादी  ‘ब’  आहे. अजूनही ‘ब ’ यादीतील ४० हजार घरे पूर्ण व्हायची आहेत. जोपर्यंत ही घरे पूर्ण होणार नाही, तो पर्यत  ‘ड’  यादीतील लाभार्थ्यांना लाभ मिळणार नाही. 

 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना