लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहरात पाणी टंचाई भासू नये, यासाठी अल्पकालीन उपाययोजना तातडीने करण्याबरोबरच दीर्घकालीन उपाययोजना करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात पाणीटंचाई काळात पाणीपुरवठा करण्याबाबत आढावा बैठक मंगळवारी मंत्रालयात मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.या बैठकीला वित्तमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत, ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार, आ. नाना श्यामकुळे, महापौर अंजली घोटेकर, स्थायी समिती सभापती राहुल पावडे, पाणी पुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव शामलाल गोयल, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, महापालिका आयुक्त संजय काकडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव संतोष कुमार आदी मान्यवर उपस्थित होते.चंद्रपूर शहराला पाणीपुरठा करणाऱ्या पाणी स्त्रोतामधील ज्या ठिकाणी पाणीसाठा कमी झाला आहे, त्या ठिकाणी गाळ काढण्याचे काम तातडीने हाती घ्यावे. या कामासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. गाळ काढल्यामुळे भविष्यात पाणीसाठा वाढण्यास मदत होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितले. यावेळी मंत्रालयातील अधिकारी वर्गही उपस्थित होता.चालू तीन संचापैकी एक संच बंद करावा : सुधीर मुनगंटीवारचंद्रपूर शहराला पावसाळा येईपर्यंत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. सध्या चंद्रपूर शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शहराच्या पाणी पुरवठ्याबाबत १५ जूननंतर आढावा घेवून चंद्रपूर औष्णिक ऊर्जा केंद्रामध्ये वीज निर्मितीसाठी चालू असलेल्या तीन संचापैकी एखादा संच बंद करावा. तसेच मृत जलसाठ्यामधून पाणी घेण्यासाठी येणारा खर्च ऊर्जा विभागाने उचलावा, अशी मागणी त्यांनी केली. तेव्हा मृत जलसाठ्यामधील पाणी उचलण्यासाठी येणारा खर्च ऊर्जा विभागामार्फत करण्यात येईल, अशी ग्वाही ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
पाणी समस्येवर कायम उपाय करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:58 AM
चंद्रपूर शहरात पाणी टंचाई भासू नये, यासाठी अल्पकालीन उपाययोजना तातडीने करण्याबरोबरच दीर्घकालीन उपाययोजना करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस : मुंबईत पार पडली चंद्रपूरच्या पाणी समस्येवर बैठक