आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : मानव विकास कार्यक्रमांतर्गत इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या आणि शाळेपासून पाच किमी अंतरापर्यंत राहणाऱ्या गरजू विद्यार्थिनींना सायकल दिली जाते़ यापूर्वी केवळ तीन हजार रुपये मिळत होते़ आता ५०० रुपयांची वाढ करण्यात आली असून त्यातील २००० रुपये आगाऊ म्हणून सायकल खरेदीपूर्वीच देण्याची तरतूद केल्याने गरजू विद्यार्थिनींना दिलासा मिळणार आहे़या योजनेंतर्गत२०१८-१९ आर्थिक वर्षापासून इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंत श्क्षिण घेत असलेल्या व शाळेपासून पाच किमी अंतराच्या आत राहणाºया लाभधारक विद्यार्थिनींना आगाऊ रक्कम देण्याची तरतूद नव्हती़ त्यामुळे सायकल खरेदी करताना विद्यार्थिनींना अडचणींचा सामना करावा लागत होता़ त्यामुळे रकमेत वाढ करावी, अशी मागणी पालक करीत होते़ किमान पाच हजार रुपये वाढ करावी, यासाठी पालकांनी संबंधित जिल्हाधिकाºयांना निवेदनही दिले़ दरम्यान, या रकमेत वाढ करुन ३५०० रुपये इतकी करण्यात शासन मान्यता दिली आहे़मानव विकास कार्यक्रमअंतर्गत इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंत शिक्षण घेणाºया विद्यार्थिनींना ही योजना उपयुक्त ठरली आहे़ पण, अल्प रकमेमुळे सायकल विकत घेण्यास अडचणी येत होत्या़ २०१८-१९ या आर्थिक वर्षापासून निवड करण्यात येणाºया लाभधारक मुलींना सायकल खरेदीसाठी आता २००० आगाऊ रक्कम मिळणार. लाभार्थी मुलींनी सायकल खरेदीची पावती व इतर कागदपत्रे सादर केल्यानंतर उर्वरीत १५०० रक्कम देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे़अंमलबजावणीकडे दुर्लक्ष करू नयेमानव विकास कार्यक्रमअंतर्गत इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंत शिक्षण घेणाºया शेकडो विद्यार्थिनींनी मागील सत्रात लाभ घेतला होता. शाळेपासून पाच किमी अंतरापर्यंत राहणाºया गरजू मुलींना सायकल वाटप केल्याने अडचण दूर झाली होती. मात्र, यातील बहुतांश विद्यार्थिनींनी सत्र सुरू झाल्यानंतर ही रक्कम लगेच मिळाली नव्हती. योजनेचा लाभ देण्यासाठी पात्र विद्यार्थिनींची निवड करणे, संबंधित शाळेच्या माध्यमातून यादी तयार करणे आदी कामे पूर्ण झाली नव्हती. परिणामी, सायकल खरेदीला बराच विलंब झाला होता. ३५०० रुपयांचा लाभ देण्यासाठी अटी व शर्तीसंदर्भात नियोजन विभागाने ३ डिसेंबर २०१३ ला आदेश जारी केला होता. तोच आदेश या सत्रातही कायम राहणार आहे. परंतु, मागील सत्राप्रमाणे विलंब करू नये, अशी मागणी पालक करीत आहेत.
सायकल खरेदीसाठी मिळणार आगाऊ रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 11:11 PM
मानव विकास कार्यक्रमांतर्गत इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या आणि शाळेपासून पाच किमी अंतरापर्यंत राहणाऱ्या गरजू विद्यार्थिनींना सायकल दिली जाते़ यापूर्वी केवळ तीन हजार रुपये मिळत होते़ आता ५०० रुपयांची वाढ करण्यात आली असून त्यातील २००० रुपये आगाऊ म्हणून सायकल खरेदीपूर्वीच देण्याची तरतूद केल्याने गरजू विद्यार्थिनींना दिलासा मिळणार आहे़
ठळक मुद्देविद्यार्थिनींना दिलासा : मानव विकास मिशनमध्ये ५०० रुपयांची वाढ