शहरं
Join us  
Trending Stories
1
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
4
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
5
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
6
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
7
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
8
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
9
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
10
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
11
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
12
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
13
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
14
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
15
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
16
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
17
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
18
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
20
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील

महिना लोटूनही धान विक्रीची रक्कम मिळाली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 4:19 AM

सावरगाव परिसरातील अनेक गावांत पाण्याचे साधन असल्याने उन्हाळी धान्य पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. येथील आदिवासी विविध कार्यकारी ...

सावरगाव परिसरातील अनेक गावांत पाण्याचे साधन असल्याने उन्हाळी धान्य पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेत एकूण ३३२ शेतकऱ्यांची नोंद आहे. यापैकी २२० शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी झाली आहे आणि ११२ शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी बारदानाअभावी थांबविण्यात आली आहे. दरम्यान, येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेने जूनमध्येच उन्हाळी धान्याची खरेदी केली आहे. धान्य खरेदी केल्यापासून आज जवळपास एक महिना उलटत चालला आहे. मात्र, अजून एकाही शेतकऱ्याच्या खात्यात खरेदी केलेल्या धान्याची रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे येथील शेतकरी आर्थिक कोंडीत सापडलेला आहे. दुसरीकडे शेतीच्या खरीप हंगामालाही सुरुवात झाली आहे. तेव्हा शेतमजुरांना मजुरीचे पैसे द्यायचे कुठून, हा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे.

बॉक्स

बोनसही नाही

त्याचप्रमाणे पावसाळी धान्य खरेदीची ७०० रुपयांप्रमाणे बोनसची रक्कमसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनपर्यंत जमा झालेली नाही. याशिवाय उन्हाळी धान खरेदीचा कालावधी आता संपत चालला असतानाही बारदाना उपलब्ध नसल्याकारणाने धान खरेदी बंद पडली आहे. अशा चौफेर आर्थिक कोंडीत अडकवून संबंधित विभागाकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करण्यात येत आहे.