महाराष्ट्राचा सन २०२०-२०२१ चा अर्थसंकल्प विधानसभेत मांडताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजनमंत्री अजित पवार यांनी, सन २०१७-२०१८, २०१८-२०१९ व २०१९-२०२० या तीन आर्थिक वर्षात घेतलेले कर्ज व्याजासह ३० जून २०२० पूर्वी परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम देण्याचे जाहीर केले होते. तसेच सन २०१८-२०१९ या वर्षात पन्नास हजारांपेक्षा कमी कर्जाची परतफेड केली असेल, अशा शेतकऱ्यांना प्रत्यक्षात पन्नास हजारांच्या खाली भरलेली रक्कम प्रोत्साहनपर म्हणून परतफेड केली जाईल, असेही सांगितले होते. परंतु दीड वर्ष लोटूनही कोरोना भयावह स्थिती असतानाही शेतकऱ्यांना देय असलेली रक्कम अजूनपर्यंत न देऊन शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केला आहे. तरी ही रक्कम अग्रक्रमाने सध्याची शेतकऱ्यांची नैसर्गिक आपत्तीची स्थिती लक्षात घेता तातडीने पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप, जिल्हाप्रमुख अरुण नवले, प्रा. ज्योत्स्ना मोहितकर, पौर्णिमा निरांजने, ॲड. श्रीनिवास मुसळे, नीळकंठ कोरांगे, गडचिरोली जिल्हाप्रमुख राजेंद्रसिंह ठाकूर, डॉ. संजय लोहे, तुकेश वानोडे, प्रा. नीळकंठ गौरकर, सुधीर सातपुते, ॲड. शरद कारेकर, रघुनाथ सहारे, दादा नवलाखे, पी. यू. बोंडे, दिनकर डोहे, घिसू पाटील खुणे, अरुण पाटील मुनघाटे, शालिक नाकाडे आदींनी केली आहे.
अर्थसंकल्पात घोषित केलेली ५० हजारांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 4:31 AM