शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
2
"मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
4
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
5
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
6
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
7
उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत या जागांवर एनडीए तर या मतदारसंघात इंडियाचं पारडं जड
8
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
9
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
10
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
11
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
12
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
13
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
14
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
15
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
16
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
17
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
18
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
19
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
20
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी

साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त

By admin | Published: July 01, 2016 1:06 AM

तळोधी (बा.) पोलीसविभागातर्फे गुरुवारी सकाळी अवैधरीत्या दारूची पुरवठा करणाऱ्या स्कॉपिओ गाडीची गुप्त माहिती मिळताच सिनेस्टाईल पाठलाग करुन

नऊ आरोपींना अटक : भद्रावती, तळोधी(बा.), गडचांदूर येथे कारवाईतळोधी (बा.): तळोधी (बा.) पोलीसविभागातर्फे गुरुवारी सकाळी अवैधरीत्या दारूची पुरवठा करणाऱ्या स्कॉपिओ गाडीची गुप्त माहिती मिळताच सिनेस्टाईल पाठलाग करुन स्कॉप्रिओ गाडी मुद्देमालासहीत ७ लाख ५३ हजार ८०० रुपयांची दारु पकडून दोन आरोपींना अटक करण्यात आली.तळोधी (बा.) पोलीस विभागातर्फे अवैधरीत्या चंद्रपूरला तळोधी मार्गे दारू नेत असल्याची गुप्त माहिती मिळताच तळोधी (बा.) पोलीस विभागातर्फे सर्वत्र नाकेबंदी करण्यात आली. मात्र आरोपी सचिन श्रीराम भोयर (२८) रा. शिवाजीनगर, महाल नागपूर, व इम्रानखान युसूफ उर्फ बाबा खान (२४) यशोधरा नगर, नागपूर हे सुसाट वेगाने पळाले. परंतु तळोधीला नाकेबंदी असल्यामुळे तळोधी पेट्रोल पंपाजवळून परत गाडी नागभीडला सुसाट वेगाने पळविली मात्र तळोधी (बा.) पोलीस स्टेशनचे शिपाई जयंत चुनारकर यांचे बाईकने पाठलाग केला. मात्र समोर पोलीस विभागाची नाकेबंदी असल्यामुळे समोरुन ड्रायव्हरने गाडी परत तळोधी मागील वळविली. आरोपीने तुकूम (तिव्हर्ला) जवळच्या नाकेबंदी पोलीस विभागाच्या गाडीवर चालविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस विभागाच्या वाहन चालक सतीश वंजारी यांच्या समय सूचकतेमुळे पोलीस वाहनातील शांताराम चनेकर, रामचंद्र जनेकर, चांगदेव गिरडकर, हंसाराजा सिडाम, सतीश नेवारे, संजय मांढरे हे थोडक्यात बचावले. ओवाळा बोकडोह नाल्याकाठी आरोपीने गाडी सोडून फरार होण्याचा प्रयत्न केला. मात्र तळोधी पोलीस स्टेशनचे शिपाई जयंत चुनारकर यांनी पाठलाग करुन आरोपीला अॉटोमध्ये बसताना पकडले. आरोपींना अटक करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. सदर कारवाई तळोधी (बा.) ठाणेदार विवेक सोनवाने यांच्या मार्गदर्शनात झाली. (वार्ताहर)गडचांदूर येथे दारू जप्तगडचांदूर: बेला येथून गडचांदूरकडे अवैध विदेशी दारू आणताना तीन मोटरसायकल पकडल्या. तसेच सहा आरोपींकडून ३२१ विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरटकर यांच्या विशेष पथकाने शुक्रवारी सकाळी ९ च्या दरम्यान कोरपना रोडवरील विद्युत मंडळ कार्यालयापासून मोटार सायकल क्र. एमएच- ३४ एसी ३४, एमएच-३४ एयू- ७६६६, एमएच- ३४ एजी- ७५५४ आरोपी शंकर रामचंद्र कोटरंगे (२९) कुंदन मुकुंदा रोहने (१९), प्रणव बाळू घायवनकर (१९), विकास सांभाजी कोटरंगे (२१), सुरज शंकर आदे (१९) , उज्वल बंडू दुर्योधन (२०) यांचे जवळू ३२१ विदेशी दारू बाटल्या किंमत ५३ हजार ४०० रुपये जप्त करून आरोपीना अटक केली. तीन मोटारसायकलची किंमत दीड लाख रुपये आहे. पुढील तपास ठाणेदार विनोद रोकडे करीत आहेत. (वार्ताहर)भद्रावती पोलिसांनी पाठलाग करुन पकडली ४० पेट्या दारूभद्रावती: नागपूर- चंद्रपूर महामार्गावरुन चारचाकी वाहनातून अवैधरीत्या दारूची वाहतूक करीत असल्याची माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली. तब्बल अर्धा तास पाठलाग करुन आरोपीसह ४० पेट्या देशी दारू जप्त करण्यात आली. ही कारवाई गुरुवारी दुपारी १२ वाजता करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अजय रामदास मुंडे (३४) रा. हिंगणघाट असे असून हा एमएच-४० यू- २९२६ या चारचाकी वाहनाने देशी दारू वाहतूक करीत असल्याची माहिती पोउनि सुशील धोकटे यांना मिळाली. आयुध निर्माणी गेटजवळ नाकाबंदी असल्याने वाहन चालबर्डी गावाच्या दिशेने वळविले. तब्बल अर्धा त्या वाहनाचा पाठलाग करुन शेतशिवारातून ताब्यात घेतले. गाडीतील ४० पेट्या दारु दोन लाख व चारचाकी वाहन १० लाख असा १२ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाही ठाणेदार विलास निकम , पोलीस उपनिरीक्षक सुशील धोकटे नापो धनराज गेडाम यांनी केली. (शहर प्रतिनिधी)