कोरोना परिस्थितीमुळे शालेय पोषण आहार योजनेंतर्गत सन २०२१च्या उन्हाळी सुट्टीसाठी केवळ एक वेळ विशेष कल्याणकारी उपाय म्हणून सर्व पात्र विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेच्या आहार खर्चाच्या रकमेइतके आर्थिक साहाय्य थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी)द्वारे लाभार्थींच्या बँक खात्यात जमा करण्याचे ठरविले. परंतु यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता नवीन परिपत्रक काढण्यात आले असून, पालकांच्या किंवा संयुक्त नावाने असलेल्या बॅंक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
नव्या निर्णयामुळे पालकांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे (प्राथमिक) पदाधिकारी प्रकाश चुनारकर, मोरेश्वर गौरकार, संजय लांडे, अजय बेदरे, अमोल देठे, विलास बोबडे, विजयालक्ष्मी पुरेड्डीवार, सुशांत मुनगंटीवार, संतोष जिरकुंटवार, मधुसूदन रेड्डी, योगिनी दिघोरे, राजेंद्र पांडे आदींनी समाधान व्यक्त केले आहे.