शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
3
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
4
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
5
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
6
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
7
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
8
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
9
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
10
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
11
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
12
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
13
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
14
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
15
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
16
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
17
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
18
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
19
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
20
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक

अमरावतीचा विजय भोयर ठरला ‘खासदार श्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 10:57 PM

सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील अग्रणी असलेल्या कमल स्पोर्टींग क्लब व इंडियन बॉडी बिल्डींग फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने रविवारी पार पडलेल्या खासदार चषक २०१९ विदर्भस्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेत अमरावतीचा विजय भोयर ‘खासदार श्री’ चषक तर अमरावतीचाच सर्वेश साहू हा बेस्ट पोझरचा मानकरी ठरला.

ठळक मुद्देसर्वेश साहू बेस्ट पोझर : विदर्भस्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील अग्रणी असलेल्या कमल स्पोर्टींग क्लब व इंडियन बॉडी बिल्डींग फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने रविवारी पार पडलेल्या खासदार चषक २०१९ विदर्भस्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेत अमरावतीचा विजय भोयर ‘खासदार श्री’ चषक तर अमरावतीचाच सर्वेश साहू हा बेस्ट पोझरचा मानकरी ठरला.शिवाजी चौक, पटेल हायस्कूलसमोर पार पडलेल्या बॉडी बिल्डींग स्पर्धेत चंद्रपूरसह नागपूर, अकोला, अमरावती, बुलडाणा जिल्ह्यातून स्पर्धक सहभागी झाले होते. बक्षीस वितरणाप्रसंगी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले, बॉडी बिल्डींगमध्ये सहभागी सर्व स्पर्धकांनी चिकाटी न सोडता राज्य व राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे. कमल स्पोर्टींग क्लबने खेळाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रांशी बांधिलकी जोपासत कार्य करावे, असेही ना. अहीर म्हणाले. यावेळी विजय राऊत, जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, प्रमोद कडू, खुशाल बोंडे, राहुल सराफ, उपमहापौर अनिल फुलझेले, वरोऱ्याचे नगराध्यक्ष अहेतेशाम अली, भाजयुमोचे मोहन चौधरी, कमल स्पोर्टींग क्लबचे जिल्हाध्यक्ष रघुवीर अहीर, आयबीबीएफ विदर्भ अध्यक्ष राजेश तोमर, नगरसेवक राजेंद्र अडपेवार, जिल्हाध्यक्ष दिलीप सेनगारप, सचिव नरेंद्र भुते व अन्य मान्यवर उपस्थित होते. जि. प. अध्यक्ष भोंगळे व विजय राऊत यांनीही स्पर्धेच्या उपयोगीतेवर भाष्य केले. राष्ट्रीय पंच म्हणून दिलीप सेनगारप व नरेंद्र भुते यांनी जबाबदारी सांभाळली. कार्यक्रमाप्रसंगी राहुल गायकवाड, सतीश गोहोकार, पवन पुरेली, शिवम त्रिवेदी, रवी बनकर, अभिनव लिंगोजवार, जितेश वासेकर, धनंजय मुफकलवार, विपिन मेंढे, अक्षय ठक्कर, फैजान शेख, इम्रान खान, श्यामल अहीर, चंदन अहीर, महेश अहीर, विनय अहीर, अजेय अहीर, कमल कजलीवाले, हेमराज काबलीया, वैभव कजलीवाले यांनी सहकार्य केले.स्पर्धेतील पुरस्कार विजेतेबॉडी बिल्डींग स्पर्धेत अमरावतीचा विजय भोयर ‘खासदार श्री’ पारितोषिकाचा मानकरी ठरला. ६० कि.गॅ्र. वजन गटातील निलेश राऊत (अमरावती) प्रथम तर मनोज महाले नागपूर द्वितीय, सुशिल पटले तृतीय, संदीप ठाकूर चतुर्थ तर अक्षय टिकेकर अमरावती पाचव्या पुरस्काराचा मानकरी ठरला. ६५ कि.ग्रॅ. वजन गटातील विजय ढोके अकोला प्रथम, श्रीकांत बोरसरे चंद्रपूर द्वितीय, संजय श्रीवास नागपूर तृतीय, मनीष बाथे नागपूर चतुर्थ, मनोज पहुरकर बुलढाणा पाचवा, ७० कि.ग्रॅ. वजनगट अफाक खान नागपूर प्रथम, सॅम गिचारीया नागपूर द्वितीय, अभिषेक गायकवाड नागपूर तृतीय, शुभम कडू नागपूर चतुर्थ, योगेश विश्वकर्मा, नागपूर पाचवा, ७५ कि.ग्रॅ. गटात कमलेश कश्यप, चंद्रपूर प्रथम, आमिर शफी, नागपूर द्वितीय, सुयश जडीये, अकोला तृतिय, सैयद रशिद नागपूर चतुर्थ, राम अटकापुरवार चंद्रपूर पाचवा, ८० कि.ग्रॅ. गटात प्रणिल लांजेवार नागपूर प्रथम, इशांत पंडित नागपूर द्वितीय, नुसरत खान अकोला तृतीय, मजहर बेग चंद्रपूर चतुर्थ, रवी वाकोडे चंद्रपूर पाचवा, ८५ कि.ग्रॅ. सर्वेश साहू अमरावती प्रथम, वैभवन मकंर्टेवार अकोला द्वितीय, किशन तिवारी नागपूर तृतीय, आकाश दुब्बलवार अमरावती चतुर्थ, गुलशन सिंह सिद्धू नागपूर पाचवा, ८५ कि.ग्रॅ.वरील स्पर्धकात संतोष वाघ वर्धा द्वितीय, रविंद्र ठाकरे भंडारा तृतीय, शेख सलमान खान अमरावती चतुर्थ तर अमरावती येथील अक्षय पतंगरे यांना पाचवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.