शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

आणि बॉम्ब शोध पथक धडकले

By admin | Published: July 18, 2015 12:49 AM

वेळ: दुपारी १.३० वाजता...स्थळ: चंद्रपुरातील आझाद बागेतील वाहनतळ...कचऱ्याच्या कंटेनगरलगत एक प्रवासी बॅग ठेवलेली...बराच वेळ ती बॅग एकाकी असते...

आझाद बागेतील घटना : बेवारस बॅग अन् पोलिसांची तत्परताचंद्रपूर : वेळ: दुपारी १.३० वाजता...स्थळ: चंद्रपुरातील आझाद बागेतील वाहनतळ...कचऱ्याच्या कंटेनगरलगत एक प्रवासी बॅग ठेवलेली...बराच वेळ ती बॅग एकाकी असते...कुणीतरी मग शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप सिरस्कर यांना मोबाईलवरून बॅगबाबत माहिती देतो...सिरस्करही या प्रकाराचे गांभिर्य ओळखून लगेच आपल्या सहकाऱ्यांना घटनास्थळी धाडतात... पाठोपाठ तेदेखील पोहचतात... काही क्षणातच बॉम्ब शोधक पथकही तेथे दाखल होते... यंत्राद्वारे बॅगेची तपासणी केली जाते...मात्र त्यात सीएफएल बल्बचे रिकामे बॉक्स, कपड्यांवर लावण्याचे काही स्टीकर दिसून आले...आणि पोलिसांसह व तेथे उपस्थित नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.शहरातील आझाद बागेच्या परिसरात सदैव नागरिकांची वर्दळ असते. बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांची वाहने ठेवण्यासाठी येथे वाहनतळ निर्माण करण्यात आले आहे. याच ठिकाणी कचऱ्याचे एक कंटेनरही आहे. शुक्रवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास या कंटेनरशेजारी असलेल्या एका भिंतीवर काही साहित्य भरून असलेली एक प्रवासी बॅग अनेकांच्या नजरेत भरत होती. ती बॅग बऱ्याचवेळापासून एकाकी असल्याने अनेकांना त्याबाबत संशय आला. सदर बॅग सुस्थितीत असल्याने कुणीतरी ती विसरले असावे, असा अंदाज नागरिक व्यक्त करीत होते. त्या बॅगमध्ये अन्य काही घातक वस्तू तर नाही, अशीही शंका अनेकांना आली. यापुर्वीही कस्तुरबा मार्गावर एक संशयास्पद सुटकेस आढळून आली होती. याबाबत माहिती मिळताच शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जावून सुटकेसबाबत खातरजमा केली होती. (प्रतिनिधी)पोलिसांचे प्रसंगावधानएकाने पोलीस निरीक्षक प्रदीप सिरस्कर यांना या बॅगबाबत माहिती देतात, अवघ्या काही वेळात पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यापाठोपाठ ठाणेदार प्रदीप सिरस्कर हेदेखील तेथे पोहचले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून बॉम्ब शोधक पथकही घटनास्थळी पोहचले. एव्हाना या ठिकाणी कुतूहलापोटी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. यंत्राद्वारे केली तपासणी बॉम्ब शोधक पथकाने अतिशय सावधतेने या बॅगची यंत्राद्वारे तपासणी केली. मात्र त्यात बॉम्ब नसल्याची खात्री पटताच, ती उघडण्यात आली. तेव्हा त्यात सीएफएल बल्बचे रिकामे डबे आढळून आले. इतरही काही साहित्य होते. बॅग ठेवणाऱ्याचा घेणार शोधमुळात निकामी वस्तू भरलेली बॅग कचऱ्याच्या कंटेनरमध्ये न टाकता खोडसाळपणे कंटेनरच्या बाजुला असलेल्या भिंतीवर संशयास्पदरित्या ठेवण्यात आली. ही बॅग नेमकी कुणी ठेवली याचा शोध पोलीस घेत आहेत. नागरिकांच्या मनात भय निर्माण होईल, असे खोडसाळ कृत्य करणे हादेखील गुन्हा आहे. आजचा प्रकार हा त्यातलाच असावा, अशी शंका आहे. त्यामुळे आम्ही बॅग ठेवणाऱ्याचा शोध घेत आहोत. नागरिकांनीही अशा विषयात सतर्क राहून कुठे संशयास्पद वस्तू वा बॅग आढळून आल्यास पोलिसांना याबाबत माहिती द्यावी.-प्रदीप सिरस्कर, निरीक्षक, शहर पोलीस ठाणे, चंद्रपूर