चंद्रपूर : राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांचा ताफा आज सकाळी 8.45 च्या दरम्यान चंद्रपूर-बल्लारशाह बायपास रोड बल्लारपूरच्या दिशेने चालला होता. त्यावेळी, अष्टभुजा मंदिरापासून पुढे काही अंतरावर दोघेजण जखमी अवस्थेत पडून होते.
अहीर यांनी जखमींना पाहताच आपला ताफा तिथेच थांबविला. अपघातग्रस्तांच्या मदतीला ते धावून गेले. अपघातात जखमी झालेल्यांना त्यांनी स्वतः ऑटो थांबवून दवाखान्यात पाठवण्यास मदत केली. सरकारी हॉस्पिटलमध्ये डॉ. जीवने यांना संपर्क करीत जखमींना तात्काळ उपचार देण्याच्या सूचना केल्या. अहिर यांच्या या कर्तव्यदक्षतेचं आणि संवेदनशीलपणं कौतुक होत आहे. एक जबाबदार लोकप्रतिनिधी बनून अहिर यांनी केलेलं काम निश्तिच लोकप्रितिनिधींबद्दलचा दृष्टीकोन बदलणारं आहे.