घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : डोंगरगाव येथील धानाचे पीक विविध रोगांच्या विळख्यात आले असून कापणीचाही खर्च निघेनासा झाला आहे. मग मळणीचा खर्च कसा करायचा, या भावनेने उद्विग्न झालेल्या काही शेतकºयांनी बांधातील धान पिकालाच आग लावल्याचा प्रकार समोर आला आहे.नागभीडपासून पाच किलोमीटर अंतरावर हे गाव असून या गावात जवळजवळ ९० टक्के लोक शेतकरी आहेत. गावाची अर्थव्यवस्थाही शेतीवरच अवलंबून आहे. असे असले तरी यावर्षी येथील अर्थव्यवस्था कोलमडून पडण्याची चिन्ह आहेत. येथील बहुतेक शेतकºयांकडे स्वत:ची सिंचनाची सोय असल्याने डोंगरगांव येथील शेतकरी धानाचे उत्पादन चांगल्या प्रकारे घेतात. यावषीर्ही या शेतकºयांनी अगदी प्रांरंभापासून हंगामाचे सर्व सोपस्कार वेळेवर पार पाडले. वेळेवर पºहे, वेळेवर रोवणी व वेळेवर खतपाणी केल्याने येथील धानाचे पीक जोमाने वाढून आले. आता हे पीक अंतिम टप्प्यात आले असतानाच या धानपिकांवर विविध रोगांनी हल्ला चढविला आहे. यात मावा, तुडतुडा, करपा, लाल्या या रोगांचा समावेश आहे. या रोगांच्या निवारणासाठी शेतकºयांनी दोन-तीनदा फवारणी केली. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. उलट रोगांचा प्रभाव वाढतच आहे. आता तर परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की पूर्ण बांध्याच रोगांनी फस्त केल्या आहेत.बांधांमध्ये केवळ तणस शिल्लक उरले आहे. गुरांच्या वैरणासाठी हे तणस कापतो म्हटले तर कीटकनाशकांच्या अतिफवारणीमुळे गुरेही या तणसाला तोंड लावत नाही. त्यामुळे कापणीलाच परवडत नाही तर मळणीला कसे परवडणार, या विचाराने धान कापण्याचा निर्णय शेतकºयांनी सोडला आहे. काही शेतकºयांनी शेतातील धान पिकालाच आग लावून दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओमप्रकाश पाथोडे, परसराम रामटेके, रामभाऊ हेमणे, शांताबाई खोपे या शेतकºयांनी स्वत:च्या शेतातील धान पिकाला आग लावून दिल्याची माहिती आहे.शेतकºयांची अवस्था अतिशय बिकट आहे. शासनाने शेतकºयांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आर्थिक मदत करावी. संपूर्ण गावातील शेती विविध रोगांच्या प्रभावाखाली असून शेतकरी खचून गेले आहेत.- गजानन पाथोडे, संचालक,जि.म.स.बँक व शेतकरी डोंगरगावमला चार एकर शेती आहे. मी एकरी १५ ते १६ हजार रुपये खर्च केले. पण आता धानाची कापणी करून मळणी करायला परवडत नाही. मी केलेला खर्च फूकट गेला. मला पुढचा हंगाम करायला सोयीचे व्हावे म्हणून धानाला आग लावत आहे.- रामभाऊ हेमणे, शेतकरी
अन् त्यांनी स्वत:च लावली पिकांना आग !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 12:13 AM
डोंगरगाव येथील धानाचे पीक विविध रोगांच्या विळख्यात आले असून कापणीचाही खर्च निघेनासा झाला आहे. ....
ठळक मुद्देविविध रोगांचे आक्रमण : धान पिकांची झाली तणस