ठळक मुद्देशोभा बोगावार : अन्यायकारक धोरणांचा किसान सभेकडून निषेध
<p>लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या प्रलंबित प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यात आले़ बालकांच्या हितासाठी सुरू असलेल्या योजनांमध्येही कपात केली़ त्यामुळे बालकांचे आरोग्य धोक्यात आले़ या अन्यायकारक धोरणांविरूद्ध संघटीत व्हावे, असे प्रतिपादन् शोभा बोगावार यांनी केले़ किसासभा व सिटूच्या वतीने पार पडलेल्या सभेत त्या बोलत होत्या़राज्य शासनाच्या धोरणांविरूद्ध ९ आॅगस्टला जेलभरो कार्यक्रमात घोषित करण्यात आल्याची माहिती कुंदा वाघमारे यांनी दिली़ कुंदा वाघमारे म्हणाल्या सर्व असंघटीत कामगांना १८ हजार रूपये किमान वेतन, ६० वर्षांवरील वृद्धांना पाच हजार रूपये पेंशन लागू करावे, स्वामीनाथन कमिटीच्या शिफारशींची अंमलबजावणी करून उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा द्यावा, आदी मागण्यांबाबत सभेत चर्चा करण्यात आली़ यावेळी अंगणवाडी महिला, आशा वर्कर, ग्रामरोजगार सेवक, शालेय पोषण आहार तयार करणाऱ्या जिल्ह्यातील बहुसंख्य महिला उपस्थित होते़शेतकऱ्यांकडे वेधले लक्षशेतकऱ्यांची आर्थिक स्थिती वाईट आहे़ त्यामुळे स्वामीनाथन कमेटीच्या शिफारशी अंमलबजावणी करून उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा देऊ न हमीभाव देण्याची मागणी किसान सभेने केली़ अंगणवाडी महिला, आशा वर्कर, ग्रामरोजगार सेवकांच्या समस्यांकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे, असा आरोपही किसान सभेच्या पदाधिकाºयांनी केला आहे़अंगणवाडी सेविकांनी संघटित व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 10:25 PM