जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना मोबाईल देण्यात आले आहे. या माध्यमातून पोषण आहार वाटप, बालकांची तपासणी, लसीकरण, गावातील कुपोषित बालकांचे वजन, गोदर माता, किशोरवयीन मुली यांसह इतर विविध कामांची माहिती दैनंदिन ऑनलाईन भरायची आहे. मात्र तांत्रिकदृष्ट्या मोबाईल योग्य नसल्याने तसेच पोषण ट्रकर इंग्रजीमध्ये असल्याने मराठी माहिती भरता येत नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविकांची मोठी पंचाईत होत आहे. कामकाजाची भाषा मराठी करावी, यासह इतर मागण्यांना घेऊन अंगणवाडी सेविकांनी शासकीय मोबाईल परत केले आहे. त्यामुळे आता ऑफलाईन कामकाज केले जात आहे.
बाॅक्स
कामाचा व्याप
अंगणवाडी सेविकांना यापूर्वी विविध प्रशासकीय कामे करावी लागत होती. त्या कामांचा अहवाल ऑनलाईन द्यावा लागत होता. त्यात पोषण आहार, तसेच इतरही माहिती भरावी लागते. अनेकवेळा खासगी मोबाईल वापरून ऑनलाईन माहिती भरण्याची वेळ अंगणवाडी सेविकांवर आली आहे.
बाॅक्स
म्हणून केला मोबाईल परत
१. अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेल्या मोबाईलची मेमरी आणि रॅम कमी असल्याच्या तक्रारी आहे.
२. मोबाईल सतत हॅंग होत आहे. त्यामधील ॲप बरोबर चालत नाही.
३. माहिती भरताना इंग्रजी भाषेची अडचण येते. मराठी भाषा कामकाजासाठी वापरण्याची मागणी आहे.
कोट
अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेल्या मोबाईलमध्ये अनेक अडचणी आहे. त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ऑनलाईन काम करताना मोबाईल व्यवस्थित चालत नाही. त्यामुळे नवे आणि चांगल्या दर्जाचे मोबाईल देण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठीच जुने मोबाईल परत करण्यात आले आहे.
-इम्रान कुरेशी
जिल्हाध्यक्ष, अंगणवाडी कर्मचारी सभा
कोट
काही अंगणवाडी सेविकांनी मोबाईल परत केले आहे. शासनाच्या पत्रानुसार जमा केलेले मोबाईल परत नेण्यासाठी सुचविण्यात आले आहे. अंगणवाडी सेविकांच्या मागण्या आम्ही शासनाकडे पाठविल्या आहे. सध्या कामकाज ऑफलाईन सुरू आहे.
-संग्राम शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, बा. क., जिल्हा परिषद चंद्रपूर
बाॅक्स
जिल्ह्यातील एकूण अंगणवाडी - २६८४
अंगणवाडी सेविका-२५४९