लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : सीआयटीयू संलग्न अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने बल्लारपूर येथील नगरपालिका बचत भवन परिसरातून अंगणवाडी कार्यकर्त्यांचा धडक मोर्चा सोमवारी दुपारी २ वाजता काढण्यात आला.अंगणवाडी कार्यकर्त्या, मदतनिसांनाच्या मानधनात वाढ करून राज्य सरकारी कर्मचाºयांचा दर्जा देण्यास सरकारचे धोरण टाळाटाळ करीत आहे. न्याय मागण्यासाठी अंगणवाडी कर्मचाºयांनी संपाचे हत्यार उपसले असून आंदोलन तीव्र करण्यासाठी व न्याय मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी रस्त्याच्या मुख्य मार्गाने सरकारच्या गळचेपी धोरणाचा निषेध करून मोर्चा काढला. दरम्यान येथील उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांना एका शिष्टमंडळाने मागण्याचे निवेदन दिले.सीआयटीयूचे नेते रमेशचंद्र दहीवडे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. मोर्च्यात एक टोक जुने बस स्थानक तर दुसरे टोक नवीन बसस्थानक असे होते. महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी संघटनेच्या पदाधिकाºयांना अंगणवाडी कर्मचाºयांच्या मागण्या सोडविण्याचे आश्वासन दिले.परंतु अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करीत आहे. संघटनेत फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. असा आरोप मोर्चेकºयांनी केला.अंगणवाडी कर्मचाºयांनी मागील १२ दिवसांपासून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यव्यापी संप पुकारला आहे. तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारीही संपात सहभागी झाले असून आज बल्लारपूर शहरात मोर्चा काढून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.अंगणवाडी कर्मचाºयांच्या संपामुळे अंगणवाडी केंद्र बंद पडले आहेत. यामुळे अंगणवाडीतील बालकांचे पालन पोषण व आरोग्य धोक्यात आले आहे. सरकारचे धोरणही कर्मचाºयांची गळचेपी करणार ठरत आहे, असे रमेशचंद्र दहीवडे व विनोद झोडगे यांनी म्हटले आहे. अंगणवाडी कर्मचाºयांच्या मागण्या संदर्भात राज्य सरकार काय निर्णय घेते. याकडे संघटनेच्या पदाधिकाºयांचे लक्ष लागले आहे.
अंगणवाडी सेविका रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 11:24 PM
सीआयटीयू संलग्न अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने बल्लारपूर येथील नगरपालिका बचत भवन परिसरातून अंगणवाडी कार्यकर्त्यांचा धडक मोर्चा सोमवारी दुपारी २ वाजता काढण्यात आला.
ठळक मुद्देउपविभागीय अधिकाºयांना निवेदन : घोषणाबाजीतून सरकारचा निषेध