शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

विविध मागण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 11:12 PM

बालकांचा सर्वांगीण विकास, स्तनदामाता, गरोधर माता आणि किशोरवयीन मुलींच्या आरोग्याविषयी देखभाल व जनजागृती करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या समस्या शासनाच्या धोरणामुळे वाढत असल्याने त्यांच्या न्याय मागण्या तत्काळ पूर्ण करण्यासाठी एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयावर अंगणवाडी कर्मचारी महिलांनी मोर्चा काढून लक्ष वेधले.

ठळक मुद्देचिमुरात मोर्चा : सात तालुक्यातील महिलांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : बालकांचा सर्वांगीण विकास, स्तनदामाता, गरोधर माता आणि किशोरवयीन मुलींच्या आरोग्याविषयी देखभाल व जनजागृती करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या समस्या शासनाच्या धोरणामुळे वाढत असल्याने त्यांच्या न्याय मागण्या तत्काळ पूर्ण करण्यासाठी एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयावर अंगणवाडी कर्मचारी महिलांनी मोर्चा काढून लक्ष वेधले.मोर्चा हुतात्मा स्मारकापासून निघाला. चिमूर राज्य मार्गाने एकात्मिक बालविकास प्रकल्प पंचायत समिती चिमूर येथे नेण्यात आला. नंतर मोर्चाचे रुपांतर सभेत करण्यात आले. दरम्यान मागण्याचे निवेदन एकात्मिक बालविकास प्रकल्प विस्तार अधिकारी प्रमोद जोनमवार यांना देण्यात आले. यावेळी कर्मचारी सभेचे कार्याध्यक्ष चंद्रशेखर शुक्ला, किसनाबाई भानारकर, इंदिरा आत्राम, कमल बारसागडे उपस्थित होते.अशा आहेत मागण्या२५ पेक्षा कमी मुले असतील तर ते अंगणवाडी केंद्र बंद करून शेजारच्या अंगणवाडी केंद्रात समाविष्ट करा, या आशयाचे आदेश रद्द करण्यात यावे, मानधनात वाढ, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देणे, गणवेशासाठी दोन हजार रुपये देणे, सेवा समितीच्या लाभाच्या रकमेमध्ये तीन पटीने वाढ करण्यात यावी, जनश्री योजनेची पुर्ववत अंमलबजावणी करण्यात यावी, अंगणवाडी कर्मचारी सेवानिवृत झाल्यास त्या जागी त्यांच्या वारसांना कामावर घेण्यात यावे, अंगणवाडीच्या अतिरीक्त कामाकरिता मानधनाच्या पन्नास टक्के रक्कम देन्यात यावी, आजारपणाची एक महिन्याची भर पगारी सुटी देण्यात यावी आदी मागण्याचे निवेदन उपविभागीय अधीकारी भैया साहेब बेहरे यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बालविकास विभाग, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पाठविण्यात आले.