लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यातील बामणी (दु) ग्रा. पं. हद्दीतील भार्गती नाल्यात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे. तसेच तेथील पाणी रसायनयुक्त असल्याने जनावरांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नाल्याची स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.बामणी ग्रामपंचायतीच्या लगत बल्लारपूर-कोठारी या मुख्य रस्त्यावर भार्गती नाला आहे. या नाल्याच्या कडेला बामणी प्रोटीन्स व खर्डा फॅक्टरी आहे. या फॅक्टरीचे रसायणयुक्त पाणी नाल्यात सोडल्या जात असल्याने पाणी हिरवेगार व क्षारयुक्त बनलेले आहे. तसेच नाल्याच्या पूलाखाली वाहत्या पाण्याला अडविण्यात आले आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह थांबल्याने नाला कोरडा पडला आहे.भार्गती नाल्यात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा खच भरला आहे. त्यामुळे पाणी वाहून जाण्यास अडचण निर्माण झाली असून सर्वत्र दुर्गंध पसरली आहे. या नाल्याचे पाणी शेतकरी शेतीच्या सिंचनासाठी तसेच जनावरेसुद्धा या नाल्यातील पाणी पीत होते. मात्र नाल्यात टाकण्यात आलेल्या कचऱ्यामुळे तसेच नाल्यात सोडण्यात येत असलेल्या रसायनयुक्त पाण्यांमुळे शेतकºयांच्या पिकाला व जनावरांना धोका निर्माण झाला आहे. मात्र याकडे स्थानिक ग्रा. पं. प्रशासन, पर्यावरणवादी संघटना तसेच पाणी प्रदूषण विभागाचे दुर्लक्ष होत आहे. मात्र नाल्याची स्वच्छता न झाल्यास शेतकºयांची हानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाल्याची स्वच्छता करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.भार्गती नाल्यात प्लॉस्टिक पिशव्या व कचरा टाकल्याने पाणी गढूळ बनले आहे. सदर नाल्यात बामणी प्रोटीन्स व खर्डा फॅक्टरीतून पाणी सोडल्या जात असल्याची बाब खरी असल्यास संबंधिताकडून तपासणी केली जाईल. सत्य आढळल्यास संबंधित विभागाला पत्र पाठवून कारवाईस बाध्य करणार.- सुभाष ताजणे, सरपंच ग्रा. पं. बामणी
रसायनयुक्त पाण्यामुळे जनावरांना धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 11:05 PM
बल्लारपूर तालुक्यातील बामणी (दु) ग्रा. पं. हद्दीतील भार्गती नाल्यात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे. तसेच तेथील पाणी रसायनयुक्त असल्याने जनावरांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नाल्याची स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.
ठळक मुद्देभार्गती नाल्याची स्वच्छता करा : ग्रामपंचायतचे दुर्लक्ष